Aurangabad Waluj News 
मराठवाडा

शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू, रुग्णालयात गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : उपचारासाठी आलेल्या एका 24 वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. बुधवारी (ता. सहा) सायंकाळी सातच्या सुमारास बजाजनगर येथील माणिक हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर विवाहितेच्या नातेवाइकांनी चांगलेच धारेवर धरत रोष व्यक्त केला. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी वेळीच धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शिवाजीनगर, सिडको वाळूज महानगर येथील शीतल भूषण पाटील (24) थायरॉईड आजाराने त्रस्त होती. त्यामुळे बुधवारी (ता. सहा) सकाळी 8.45 च्या सुमारास ती बजाजनगर येथील रुग्णालयात आली होती. तिला दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात आली. सायंकाळी 7.10 वाजता मृत्यू झाला.

गंभीर आजार नसतानाही तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर रुग्णालयात धाव घेत डॉक्‍टरांना धारेवर धरले. यावेळी नातेवाईक व डॉक्‍टरांमध्ये हमरीतुमरी झाली. या प्रकारामुळे दवाखान्यात मोठा गोंधळ उडाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत रवाना केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत. 

डॉक्‍टर ठाण्यात, पोलिस रुग्णालयात

शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. या घटनेला डॉक्‍टरच जबाबदार असल्याचा नातेवाइकांनी आरोप केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्‍टरांना पोलिस संरक्षण देत पोलिस ठाण्यात आणले. तर मृत महिलेचे नातेवाईक रुग्णालयाची तोडफोड करतील व प्रकरण चिघळेल, यासाठी दंगा नियंत्रण पथकासह वाळूज एमआयडीसी पोलिस तैनात होते. 

पोलिसांची मध्यस्थी 

या घटनेमुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाल्याने पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी मध्यस्थी करून नातेवाइकांची समजूत काढली. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी नमती भूमिका घेत मृतदेह घाटीत नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT