papai.jpeg 
मराठवाडा

पपईने बनविले लखपती 

प्रभाकर बारसे

गिरगाव (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील नामदेव साखरे या शेतकऱ्याने शेततळ्यातील पाण्यावर दोन एकरात वर्षभरात दीड लाखाचे उत्पन्न घेतले आहे. परतीच्या पावसाने इतर पिकांचे नुकसान झाले असताना त्यांना पपई पिकाने दिलासा दिला आहे. याेग्य नियोजन, जिद्द व मेहनतीच्या जाेरावर हे शक्य झाल्याचे श्री. साखरे यांनी सांगितले.

येथील शेतकरी नामदेव साखरे यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतात विहीर, बोअरवेल व शेततळे घेतले आहे. परंतु, विहीर व बोअरवेलचे पाणी उन्हाळ्यात कमी पडते. त्यामुळे विहीर व बोअरवेलचे पाणी शेततळ्यात साठवून ठेवतात. मात्र, पारंपारिक पिकातून अपेक्षित उत्पादन हाती लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये दोन एकरात पपई लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पपईची दीड हजार रोपे लावली. त्‍याचे योग्य नियोजन केले. शेततळ्यात साठवून ठेवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करत खताची मात्रा देवून झाडे जगविली. आता पपईची तोडणी सुरू असून रोपे ते विक्रीपर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला. मालेगाव (जि. नांदेड) येथील एका व्यापाऱ्याने दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्‍विंटल प्रमाणे पपईची खरेदी केली आहे. यातून त्‍यांना दोन एकरात खर्चवजा जाता दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. परतीच्या पावसाने पारंपारिक पिके हातची गेली आहेत. या पिकांतून लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे टाकले होते. मात्र, पपई पिकाने दिलासा दिला आहे. योग्य नियोजन, काटकसर, जिद्द व कठोर मेहनतीमुळे हे शक्‍य झाले असून यासाठी कुटुंबीयांची मोठी मदत झाल्याचे श्री. साखरे यांनी सांगितले. 

पारंपारिक पिकांबरोबर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी योग्य नियोजन केले. शेतात असलेल्या विहीर व बोअरवेलचे पाणी शेततळ्यात जमा करून पपईला दिले. लागवड ते काढणीपर्यंत वीस हजारांचा खर्च आला. आता खर्च वजा जाता दीड लाख रुपयाचे उत्‍पन्न हाती आले. योग्य नियोजन, जिद्द व कठोर मेहनतीमुळे हे शक्‍य झाले आहे.
- नामदेव साखरे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघाला धक्का! २२ वर्षीय खेळाडू पहिल्या तीन T20I सामन्यांतून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Police Bharati Application Website Link : पोलिस भरतीचा अर्ज करा एका क्लिकवर..

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा

बापरे! पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT