फोटो 
मराठवाडा

मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त, नांदेड पोलिसांची कारवाई 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या विशेष पथकानी नगिना घाट परिसरातील एका दुकानावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता. १९) रोजी सांयकाळी केली. पोलिसांनी दुकानचालक रणजीतसिंग सरदार याला अटक केली. 

शहराच्या नंदीग्राम सोसायटीमध्ये राहणारा रणजीतसिंग रामसिंग सरदार (वय ३५) याचे नगिना घाट परिसरात दुकान आहे. या दुकानात अवैधरित्या तलवारी, खंजर, गुप्ती, कुकरी आदी शस्त्र साठा बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार आणि पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस ज्ञानोबा देवकते यांनी आपले सहकारी देवा चव्हाण, श्रीराम दासरे, राजीव बोधगीरे, हेमंत कांबळे, शेख इसराईल, राजेंद्र ठाकरे आणि राजकुमार कोडगीरे यांना सोबत घेऊन रणजीतसिंग सरदार याच्या दुकानावर कारवाई केली. 

४१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

यावेळी दुकानातून २५ तलवारी, सहा खंजर, चार गुप्ती, पाच कुकरी असा अंदाजे ४१ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी रणजीतसिंग सरदार याला ताब्यात घेऊन वजिराबाद पोलिस ठाण्यात हजर केले. एपीआय ज्ञानोबा देवकते यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी रणजीतसिंग सरदार याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास वजिराबाद पोलिस करीत आहेत. 

दुकानदारांना आवाहन

नगिनाघाट व गुरूद्वारा परिसरातील परवानाधारक दुकानदारांनी आपल्या दुकानात विनापरवाना घातक शस्त्र विक्रीसाठी ठेवु नये. या परिसरातील अनेक दुकानांची अचानक तपासणी करण्यात येणार असून पोलिसांच्या रोषास बळी पडु नका. आपणास ज्या वस्तु विक्री करण्याचा परवाना आहे त्याच वस्तु आपल्या दुकानात ठेवावे. तसेच घातक शस्त्र आढळून आल्यास आपल्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. या घातक शस्त्रामुळे शहरातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानात अशी शस्त्र ठेवू नये.
विजयकुमार मगर, पोलिस अधीक्षक, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT