Genital mutilation Sakal
मराठवाडा

बीड : गर्भलिंगनिदान अन् अवैध गर्भपात करणारे मोठे रॅकेट

पाच जणांना ताब्यात घेतले आहे

सकाळ वृत्तसेवा

बीड - सीताबाई गणेश गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस विभाग आणि आरोग्य विभाग झपाट्याने कामाला लागला. मंगळवारी (ता. सात) शासकीय सेवेतून राजीनामा दिलेल्या एका अंगणवाडी सेविकेसह एक लॅब टेक्नीशिअन तसेच मृत महिलेचा पती, सासरा व भाऊ अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासह पोलिस पथक व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले, डॉ. संतोष शहाणे, डॉ. राम आवाड यांनी दिवसभर गेवराई परिसरात विविध ठिकाणी तपासण्या केल्या. यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय उपकरणे व इतर साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे शासकीय नोकरी सोडून अवैध गर्भपातासाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या या महिलेच्या घरातून या साहित्यासह २८ लाख ३६ हजार रुपयांची रोकड देखील तपास पथकाला आढळली आहे. आता या प्रकरणातील मोठी साखळी तपासात समोर येत असून त्यांचा शोध घेण्याचे आव्हान आहे.

रविवारी (ता. पाच) परिसरातील बकरवाडी येथील ३० वर्षीय सीताबाई गाडे या महिलेचा गर्भपातानंतर अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीत १८ आठवड्यांचा गर्भपात केल्याचे आणि गर्भपिशवीशी छेडछाड केल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या पोलिस व आरोग्य यंत्रणा या प्रकरणाशी संबंधितांचा शोध घेत असली तरी या निमित्ताने मोठी साखळी हाती लागणार आहे. त्याचा शोध घेऊन कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मृत महिलेच्या घरी येऊनच केला गर्भपात

सीताबाई गाडे ही महिला गेल्या आठवड्यातच जिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आली होती. मात्र, पहिल्या तीन मुली असल्याने तिने गर्भलिंगनिदान केले असल्याचा संशय आल्याने तिचा गर्भपात केला नाही. मात्र, त्यानंतर तीनच दिवसांनी ही घटना घडली. दरम्यान, तपासात या महिलेचा या साखळीतीलच एका खासगी नर्सने तिच्या घरी येऊन गर्भपात केला. त्यातूनच तिच्या गर्भाला इजा होऊन अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या गर्भपात करणाऱ्या खासगी नर्सचा अद्याप शोध लागलेला नाही.

गर्भपातासाठी बाहेरून यायचे डॉक्टर

तपासादरम्यान, सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा येथून डॉक्टर यायचा. सोबतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन येत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तसेच गर्भपातासाठी औरंगाबादचा एक डॉक्टर देखील येत असल्याची माहिती आहे. संबंधित एजंट अशा गर्भवती महिलांना एकत्र करायची आणि मग डॉक्टरांना कळवायची अशी माहिती आहे.

नोकरी सोडून अवैध गर्भपाताची एजंट

या प्रकरणात पोलिसांनी गेवराईजवळील एका एजंट महिलेला ताब्यात घेतले. अंगणवाडी सेविकेची नोकरी सोडून सदर महिला आता बेकायदा गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपातासाठी एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले. तीने भलेमोठे तीन मजली घर उभारले आहे. तिच्या घरात सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य (मशिन सोडून) व गर्भपाताच्या गोळ्या व इतर उपकरणे आढळली आहेत. विशेष म्हणजे २८ लाख ३६ हजारांची रोकड देखील या घरात मिळाली आहे.

साखळी शोधणार की वरोपचारी तपास?

एजंट महिलेच्या घरी सोनोग्राफीसाठी आवश्यक साहित्य आणि गर्भपातासाठीची उपकरणे आढळली आहेत. तीन मजली घर आणि २८ लाखांहून अधिक रक्कम जर एजंटच्या घरी आढळत असेल. तर, यात मोठे मोहरे १०० टक्के असणार. त्यामुळे यात मोठी साखळी आणि शेकडो गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात झाले असल्याचे सहज लक्षात येते. आता जिल्ह्यातील यंत्रणा केवळ सीताबाई गाडे या महिलेच्या अवैध गर्भपातापुरता तपास करणार की, या सगळ्या साखळीला शोधणार हे महत्त्वाचे आहे.

  • अंगणवाडी सेविकेची नोकरी सोडून अवैध गर्भपाताच्या कामात

  • सोनोग्राफीसाठी बुलढाण्याहून तर गर्भपातासाठी औरंगाबादचा डॉक्टर

  • अंगणवाडी सेविकेने नोकरी सोडून बांधले तीन मजली घर

  • घरात आढळले २८ लाख ३६ हजार रुपये

  • तीन नातेवाइकांसह एक लॅब टेक्निशिअन व महिला ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT