file photo  
मराठवाडा

...अखेर विकास निधीचे नियोजन झाले 

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हापरिषदेतील बहूचर्चीत दलितवस्ती विकास निधीसाठी मागील वर्षीच्या मंजूर ५० कोटी नियतव्यमधील प्राप्त तीस कोटी रुपये निधीचे नियोजन करण्यात आले. समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. दहा) समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये समन्यायी निधी वाटपानुसार नियोजनाचा ठराव घेण्यात आला.

ग्रामीण भागातील गावखेड्यांमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास साधण्यासाठी शासनस्तरावरुन लोकसंख्येच्या तुलनेत निधीची तरतुद केली जाते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती मार्फत दलितवस्ती विकास निधीचे समन्यायी वाटप करण्यात येते. मागील तीन वर्षापासून टप्याने चार वेळा प्राप्त निधीचे सभापती शिला निखाते यांच्या कार्यकाळात नियोजन , वाटप करण्यात आले. २०२०-२१ या आर्थीक वर्षातील मंजुर ५० कोटी नियतव्ययपैकी प्राप्त तीस कोटी रुपये निधीच्या नियोजनार्थ शुक्रवारी (ता. दहा) सभापती शिला निखाते यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठकीमध्ये नियोजनाचा ठराव घेण्यात आला. 

दिव्यांग कल्याण निधीचा ठराव 
प्रसंगी दलितवस्ती विकास योजनेअंतर्गत वस्त्यांची निवड करणे बाबतचा ठराव विषय सूची प्रमाणे घेण्यात आला. २०१८-१९ या आर्थीक वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ज्या लाभार्थ्यांनी शिलाई मशीन, सायकल, विद्युत मोटार, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, वाहन या साधनांसाठी आवेदनपत्र सादर केलेल्या लाभार्थ्यांची बैठकिमध्ये निवड करण्यात आली. पाच टक्के दिव्यांग आणि जिल्हा दिव्यांग निधी योजने अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवण्याच्या प्रस्तावास समितीने मान्यता दिली. यावेळी समिती सदस्य संगीता टकोरे, सविता वारकड, विजयश्री कमठेवाड, शकुंतला कोलमवाड - बोनलेवाड, संगीता गायकवाड, श्रीमती सुंदराबाई मरखले, भाग्यश्री साबणे, सुनयना जाधव, गंगाप्रसाद काकडे यांच्यासह समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची उपस्थिती होती. 

कार्यकाळातील अंतिम बैठक
कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह विषय समित्यांच्या कारभाऱ्यांची मंगळवारी (ता. २१) निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार समाज कल्याण सभापती शीला निखाते यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील ही अंतिम बैठक असल्याने समाज कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती निखाते यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिल्याच्या भावना व्यक्त करत त्यांचा सन्मान केला.  

येथे क्लिक करा...कर्जमाफीमुळे शेतकरी संतप्त : कसे ते वाचलेच पाहिजे ​
सर्वाधिक बजेटची नोंद
जिल्ह्याच्या स्वायत्त संस्थेमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी लागू झालेल्या आरक्षण प्रक्रियेमुळे १९९५ पासून समाज कल्याण समितीच्या सभापतींकडून दोन व जास्तीत जास्त तीन वेळा बजेटनुसार निधी वाटप करण्यात आले. मात्र, तीन वर्षांचा कार्यकाळ लाभल्याने तब्बल चार वेळा १२५ कोटी रुपये निधींचे नियोजन, वाटपाची विक्रमी नोंद सभापती निखाते यांच्या नावे झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Crime : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा! नरबळी दिल्याचा आरोप; अकोल्याच्या युवकाची इंदूरमध्ये हत्या, मांत्रिकाच्या पूजेचे व्हिडिओ आले समोर

Glasses Cleaning Tips : तुम्हीही शर्ट किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसता का? वेळीच थांबा! ही एक चूक लेन्स कायमच्या खराब करू शकते; जाणून घ्या योग्य पद्धत

Corporators Protest : सभेची कार्यपत्रिका वेळेत नाही, प्रस्तावांचा तपशीलही गायब; पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

Marathi News Live Updates : सावरकर मुद्द्यावरून महायुतीची दुटप्पी भूमिका; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

Pune Traffic : प्रयेजा सिटी परिसरातील भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीत गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू

SCROLL FOR NEXT