Lathicharge On Maratha Reservation Protesters Jalna Esakal
मराठवाडा

Jalna Lathi Charge : जालन्यातील हिंसाचार प्रकरणात १६ ज्ञात तर ३०० पेक्षा जास्त अज्ञातांवर गुन्हे दाखल; पोलिसांना जीवे मारण्याचा कटाचा आरोप

मराठा मोर्चावर लाठीचार्ज केल्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maratha Andolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

तर मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी एकूण १६ ज्ञात तर ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालन्यातील गोंदी येथील पोलीस स्थानकात त्यांच्यावर कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , काल रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलींसानी आरोपींचा शोध सुरू केला. काल मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर शेजारच्या गावांमध्ये आरोंपीचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. त्यामध्ये १६ आरोपींची ओळख पटली आहे.

त्यांच्यावर कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७ यासह सार्वजनिक मालमत्तेचे, खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणात त्याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंदोलनस्थळी काल जी दगडफेक झाली त्या अनुषंगाने पोलीसांनी शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तर यामध्ये गंभीर बाब म्हणजे पोलीसांना कट करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा जवळपास ३०७ आणि ३३३ कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ३०० ते ३५० लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

यांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेत काही पोलीसही जखमी झाले आहेत. यासंबधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT