In Latur 169 Peoples Death in Accident 
मराठवाडा

लातुरात वर्षभरात 169 नागरिकांचा अपघाती मृत्यू

सुशांत सांगवे

लातूर : सावधान, पुढे धोका आहे, अशा नियमांचे फलक रस्त्यांवर ठिकठिकाणी असतानाही बेदरकारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातांमुळे वर्षभरात तब्बल169 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अपघाताचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेने 8 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक काळजीने वाहन चालवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

लातूर शहरात आणि जिल्ह्यात अकरा ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण क्षेत्र) असले तरी वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघात होत असतात. भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांना ब्लॅक स्पॉटबरोबरच सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या ठिकाणीही लक्ष द्यावे लागत आहे. मागील वर्षी शहर आणि जिल्ह्यात 434 अपघात झाले होते. त्यात यंदा आठ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांची घटना 467 पर्यंत पोचली आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे अपघातात जीव गमवावा लागल्याच्या घटनाही जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे मागील वर्षी 174 जणांचा मृत्यू झाला होता. चालू वर्षी आत्तापर्यंत 169 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहनचालकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर यंदाची अपघातातील एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते.

अपघातांचे प्रमाण जसे वाढले आहे, तसेच अपघातात जखमी होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी 279 वाहनचालक अपघातामुळे जखमी झाले होते. तर चालू वर्षी अपघातामुळे 292 वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 

अपघाताची प्रमुख कारणे

- भरधाव वेगाने वाहन चालवणे
- वाहन चालवताना सीटबेल्ट न लावणे
- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे
- चालकाची पुरेशी झोप न होणे
- मद्यपान करून वाहन चालवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT