latur accident 
मराठवाडा

पुण्याहून गावाकडे आईला भेटायला चाललेल्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू

संतोष आचवले

वडवळ नागनाथ, (जि.लातूर): मोपेड आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषन अपघातात मोपेडस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.आठ) सकाळी लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ (ता.चाकूर) घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: लातूररोड (ता.चाकूर) येथील गोविंद निवृत्तीराव भदाडे (वय ३७) हे पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. काही कामानिमित्त ते आपल्या आईला भेटण्यासाठी रविवारी (ता.सात) रात्री ते पुण्याहून मोपेडवरून (एम.एच.१४.जे.के.१२४७) आपल्या गावाकडे येत असताना सोमवारी (ता.आठ) सकाळी लातूर- नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ असलेल्या मोतोश्री लंच होम समोर नांदेडहून- लातूरकडे निघालेल्या फोर्ड कंपनीच्या कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मोपेडवरील गोविंद भदाडे हे जागीच ठार झाले.

दरम्यान, अपघातची माहिती मिळताच घरणी येथील राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिदास उळागड्डे, जमादार दत्तात्रय गिरी, नितीन चव्हाण, राहुल गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली. यावेळी चाकूरचे पोलिस निरीक्षक सोपानराव सिरसाट, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत, पोलिस जमादार भागवत मामडगे, चालक सुशिल दिवटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मयत भदाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. भदाडे यांच्या पश्चात आई मैनाबाई भदाडे ( सदस्या- ग्रामपंचायत लातूर रोड), भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गोविंदच्या अपघाती निधनाची बातमी येताच लातूररोड गावावर शोककळा पसरली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Car Accident : स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या इनोव्हाला धडकली; अपघातात दोन आमदारांसह ६ जण जखमी

Nagpur Pothole Crisis: खड्ड्यांमुळे शहरात ‘ऑफ रोडिंग’ अनुभव; बेसा पॉवर हाऊस-म्हाळगीनगर मार्गाची दैनावस्था

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर परिणाम; पुणे-सातारासह पश्चिम महाराष्ट्रात ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायूची गळती; ४० जण रुग्णालयात दाखल

Rice Price Hike: भातावरही महागाईची धार! तांदळाच्या भावात ११ टक्क्यांची वाढ; काय आहेत नवे दर?

SCROLL FOR NEXT