latur accident. 
मराठवाडा

अर्ध्यावरती डाव मोडला...! अपघातात पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

लातूर: पुणे- सोलापूर महामार्गावरील डाळज क्रमांक दोन (ता. इंदापूर) येथे रविवारी (ता. सात) रात्री झालेल्या भीषण अपघातात येथील माने कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

येथील ‘माने टायर्स’चे मालक अरुण बाबूराव माने हे कुटुंबीयांसह कारने (एचएच २४, एटी २००४) रविवारी पुण्याहून लातूरकडे येत होते. पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवणजवळ डाळज क्रमांक दोन येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच ४५ एफ ७७७९) जात होता. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारची धडक बसली.

यात अरुण माने (वय ४५), त्यांच्या पत्नी गीता माने (३६), लहान मुलगा मुकुंदराज माने यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी साक्षी माने (१८) व चालक महादेव नेटके (५६) हे गंभीर जखमी झाले. साक्षी माने हिच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुटुंबीयांवर शोककळा
अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृत व जखमींना क्रेन व ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले. या अपघाताने माने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. सकाळपासूनच त्यांच्या येथील घरी नातेवाईक, नागरिकांची गर्दी झाली होती.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT