बँक फेडरेशनची खासगीकरणाविरोधात मोहीम sakal
मराठवाडा

लातूर : बँक फेडरेशनची खासगीकरणाविरोधात मोहीम

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर बँकांच्या शाखांचा विस्तार होत गेला.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर बँकांच्या शाखांचा विस्तार होत गेला. या घटनेला ५२ वर्ष उलटल्यानंतर सध्याचे सरकार या बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे. या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (ता. दोन) महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरवात करण्यात आली.

प्रा. रणसुभे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते मोहिमेची सुरवात झाली. श्री. कुलकर्णी यांनी शेतकरी व राष्ट्रीयकृत बँकांतील अतूट नात्याविषयी माहिती देत खासगीकरणाच्या विरोधात गावात जाऊन ग्रामसभेच्या माध्यमातून जागृती करणार असल्याचे सांगितले. बँक कर्मचाऱ्यांचे नेते उत्तम होळीकर यांनी अभिनव उपक्रमातून खासगीकरण धोरणाची जनजागृती करून हे खासगीकरण परतवून लावणार असल्याचे सांगितले. या मोहिमेत सर्व घटकांतील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत असून, त्यांना खासगीकरणाचे तोटे पटवून सांगण्यात येणार आहे. या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना देऊन खासगीकरण करून नये, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे श्री. होळीकर यांनी सांगितले.

______________________________________________________________________________

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT