republic day
republic day 
मराठवाडा

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान

युवराज धोतरे

उदगीर (लातूर): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, शिवराज तोडचिरकर, नागनाथ  निडवदे, पशुधन विकास अधिकारी सतीश केंद्रे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री ना .बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना परेड संचलन करण्यास परवानगी दिली. तालुक्यातील सैनिकी शाळा, गृहरक्षक दल, पोलिस दल यांनी संचलनात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड यांचा सत्कार ही राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार यांची भेट घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरुवात संगीता बागडे यांच्या स्वागत गीताने झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता यलमट्टे यांनी केले तर नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी आभार  मानले. कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, राजेश बेंबळगे, मंडळ अधिकारी शंकर जाधव, गणेश हिवरे, अनिल चव्हाण, तलाठी पंकज कांबळे, अमोल रामशेट्टे, दत्ता मोरे, राहुल आचमे सत्यकांत थोटे,  श्री तोडकर, श्री कवरे आदीनी पुढाकार घेतला.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT