crime news. 
मराठवाडा

सावरगावातील 'तो' खून अनैतिक संबंधांच्या संशयातून; चौघांविरूद्ध गुन्हा, एकाला अटक

विकास गाढवे

मुरूड (लातूर): सावरगाव (ता. लातूर) शिवारात बुधवारी (ता. १७) सकाळी ऊसाच्या फडात मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या खूनाचा चोवीस तासाच्या आत उलघडा करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेची दोन मुले, भाऊ व भाच्याने मिळून एका व्यक्तीचा निघृण खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केली असून त्याला सोमवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुरूडचे (ता. लातूर) सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सावरगाव शिवारात महेश अनंतराव शिंदे यांच्या उसाच्या फडात बुधवारी सकाळी नऊ वाजता एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा धारधार शस्त्रांनी वार करून गळा चिरून निघृण खून करण्यात आला होता. काही तासातच मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. ही व्यक्ती कवठा (ता. औसा) येथील भागवत रंगराव घुटे (वय ५२) असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

मयत घुटे यांचा मळणीयंत्राचा व्यवसाय असून मळणीयंत्र सावरगाव शिवारात होते. दरम्यान खंडापूर (ता. लातूर) येथे पत्नीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घुटे मंगळवारी (ता. १६) दुपारी चार वाजता घरातून बाहेर पडले ते परत आलेच नाही. उसाच्या फडात त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात घुटे यांचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे आढळून आले. घुटे यांचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून या महिलेच्या दोन मुलांनी तसेच भाऊ व भाच्यांनी मिळून घुटे यांचा खून केला.

तशी फिर्याद घुटे यांचा मुलगा किशोर याने दिल्यानंतर पोलिसांनी विकास दादाराव हिंगे व कैलास दादाराव हिंगे (रा. कवठा) तसेच पवन सतीश कांबळे व सतीश केरबा कांबळे (रा. सावरगाव, सध्या रा. हरंगुळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील सतीश कांबळे याला पोलिसांनी बुधवारी रात्री हरंगुळ येथून ताब्यात घेऊन अटक करून गुरूवारी (ता. १८) त्याला न्यायालयासमोर हजर केले. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून तपासात सतीशने खुनाची माहिती पोलिसांना दिली आहे.

अन्य तीन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना झाल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे या गुन्ह्याची तातडीने उकल करणे शक्य झाल्याचे श्री. ढोणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT