no mask no entry in latur 
मराठवाडा

Coronavirus: व्यापाऱ्यांना दुकानांवर 'नो मास्क - नो एंट्री'चे बोर्ड लावण्याचे आवाहन

हरी तुगावकर

लातूर: लातूरमध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व व्यापाऱयांनी 'नो मास्क- नो एंट्री'चे बोर्ड लावावेत, असे आवाहन लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

लातूर शहर तसेच जिल्हाभरात मागच्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलण्याच्या मानसिकतेत आहे. त्याकरिता रात्रीच्या संचारबंदीची वेळही वाढवण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. 19) लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत प्रत्येक व्यापारी बांधवाने आपल्या दुकानासमोर ' नो मास्क - नो एंट्री ' चे बोर्ड लावावेत, सर्वांनी मास्क लावूनच दुकानात बसावे, कर्मचाऱ्यांचा वापर गरजेपुरता करावा, ग्राहकांना सुद्धा मास्क लावण्याची सक्ती करावी, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे सर्व व्यापाऱयांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपआपली दुकाने, आस्थापना ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच बंद करून दंडात्मक कारवाई होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

धनंजय मुंडे तळ ठोकून, पंकजा मुंडेही दाखल; बीड जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान
 
आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, रामदास भोसले, भारत माळवदकर, विश्वनाथ किनीकर ,विशाल अग्रवाल, निसार विंधानी, दत्तात्रय पत्रावळे, राघवेंद्र इटकर, मुस्तफा शेख, रामेश्वर भराडिया आदी उपस्थित होते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT