corona death.jpg
corona death.jpg 
मराठवाडा

Corona Breaking : लातूरात कोरोनामुळे बारा जणांचा बळी; २७१ पॉझिटिव्हची भर   

हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यात गेल्या दोन दिवसात बारा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या १५६ वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.

यात (ता.०९) ऑगस्ट रोजी बामणी (ता. उदगीर) येथील (७५ वर्षीय), ता.१० ऑगस्ट रोजी उदगीर येथील (५४ वर्षीय), लातूर येथील (५५ वर्षीय), ६५ वर्षीय, ६२ वर्षीय महिला, ७५ वर्षीय व्यक्ती,  निलंगा येथील ५० वर्षीय, अहमदपूर येथील ५४ वर्षीय महिला, उदगीर येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ता. ११ ऑगस्ट रोजी लातूर येथील ७७ वर्षीय व बोरोळ (ता. उदगीर) येथील ३५ वर्षीय व्यक्ती व उदगीर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दरम्यान मंगळवारी (ता. ११) जिल्ह्यात २७१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधून २७१ जण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा चार हजार १०१ इतका झाला आहे. यात आतापर्यंत दोन हजार २३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक हजार ७१२ जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी १२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात बारानंबर पाटी येथील कोविड केअर सेंटरमधील ७८, निलंगा एक, उदगीर सहा, अहमदपूर चार, औसा १३, फुलाबाई बनसोडे रुग्णालय पाच, उदगीर सामान्य रुग्णालय एक, चाकूर १२, बिडवे अभियांत्रिकी एक तर अल्फा रुग्णालयातील तीघांचा यात समावेश आहे.

लातूर कोरोना मिटर

  • एकूण बाधित--४१०१
  • उपचार सुरु असलेले--१७१२
  • बरे झालेले--२२३३
  • मृत्यू--१५६
  • आजचे पॉझिटीव्ह--२७१

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

SCROLL FOR NEXT