Latur Corona Updates 
मराठवाडा

लातूरसाठी मार्च ठरतोय धोकादायक, सोळा दिवसांत एक हजार ७४६ रुग्ण

हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत मार्च महिना लातूरसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या चार महिन्यांच्या आकडेवारी पाहता मार्चमध्ये अवघ्या १६ दिवसांतच त्या पेक्षा अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लातूर जिल्ह्यात तीन-चार महिन्यांत सरासरी दररोज ३० ते ४० रुग्ण समोर येत होते. नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहिली. पण, मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्वसाधारण गेला. दुसऱ्या आठवड्यापासून मात्र बाधितांचा आकड्याचा आलेख वाढत चालला आहे.

यात १० ते १६ मार्च या सात दिवसाची आकडेवारी पाहिली तर ती वाढतच चालली आहे. सरासरी दीडशेवरून ती दोनशेच्या घरात गेली आहे. मंगळवारी जिल्ह्यात एक हजार ३१९ जणांची आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. पैकी ६२ तर एक हजार ४२८ जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट झाल्या. यात १२७ जण असे एकूण १८९ जण पॉझिटीव्ह आले आहेत. एकूणच बाधितांचा आकडा २७ हजार १४२ झाला आहे. यात आतापर्यंत २५ हजार १२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ३०४ जणांवर उपचार सुरु असून, ७१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांचे आकडे
नोव्हेंबर २०२०--१५५५
डिसेंबर २०२०---११५०
जानेवारी २०२१---११९५
फेब्रुवारी २०२१--११७५
मार्च २०२१ (ता. १६ पर्यंत)--१७४६

---
लातूर कोरोना मीटर
---
एकूण बाधित--२७१४२
उपचार सुरु असलेले-१३०४
बरे झालेले--२५१२१
मृत्यू--७१७

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT