Latur crime news 
मराठवाडा

सहा वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार; खेळण्याचा बहाणाने घेऊन गेला होता शेतात

गौस शेख

बेलकुंड (जि.लातूर) : एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर खेळण्याचा बहाणा करून गावाजवळील शिवारात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी भादा पोलिसात संबंधित नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर दयानंद राठोड (वय ४६) याने खेळण्याचा बहाणा करून रविवारी (ता. चार) सायंकाळी पाच ते रात्री ११ च्या दरम्यान येथील शिवारातील शेतात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी राठोड पसार होता.

तो येथील शिवारातील एका शेतात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री सहायक पोलिस निरीक्षक नाना लिंगे, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, बिटअंमलदार सुर्यप्रकाश गिरी यांच्या पथकाने आरोपी दयानंद राठोड याला अटक केली. याप्रकरणी पिडितेच्या आईच्या फिर्यादीवरून भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT