Latur District Central Cooperative Bank sakal
मराठवाडा

Latur News : लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैशाचा तुटवडा

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे ऊस बिलासाठी बँकेला हेलपाटे

युवराज धोतरे

उदगीर - गेल्या अनेक दिवसापासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उदगीर तालुक्यातील सर्व शाखामध्ये पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत जिल्हा बँकेत हवे तेवढे स्वत:च्या खात्यावरील पैसे मिळत नसल्याने शेतकरी बँकेला हेलपाटे मारत असताना दिसून येत आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुक्यातील शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेच्या खात्यावर असलेले शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने परत जावे लागत आहे. शिवाय निराधार, निराश्रीत, विधवा, अपंग यासह अनेक योजनेचे पैसे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यावर शासनाकडून मिळत असतात. मात्र त्यांना त्यांच्या खात्यावर असलेले पैसे मिळत नसल्याने बँकेला हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रात एक नावाजलेली बँक म्हणून ओळखली जाते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या बँकेवर संचालक मंडळ कार्यरत आहे. उदगीर भागात विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन व देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर्स हे दोन्ही साखर कारखाने मांजरा परिवारांचेच आहेत.

या भागातील शेतकऱ्यांचे ऊस बील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा होत असते. मात्र पैशाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यासह इतर ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यात नाराजीचा सुर उमटत असताना दिसून येत आहे.

ऐन दुष्काळी परिस्थितीत व शेती मशागत आणि लनसराईतील काळामध्ये पैशाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या रोशाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे तात्काळ निर्माण झालेला चलन तुटवडा भरून काढून उदगीर तालुक्यातील सर्व शाखेमध्ये मुबलक चलन पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्हा बँकेकडून चलनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने चलन टंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसामध्ये चलन पुरवठा सुरळीत होणार आहे. शेतकऱ्यांना हवे तेवढे त्यांच्या खात्यावरील पैसे मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

- संजय शिंदे , फिल्ड ऑफिसर जिल्हा मध्यवर्ती बँक उदगीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT