Latur farm manure process with help of tractor  sakal
मराठवाडा

लातूर : शेणखतासाठी शेतकऱ्यांची लगबग

जळकोट तालुक्यातील चित्र : उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू

विवेक पोतदार

जळकोट : यावर्षीची खरिपपूर्व शेतीकामे सुरु असून मशागतीच्या कामातून वेळ काढत अनेक शेतकरी शेणखत घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेणखत घालण्याची सध्या लगबग असल्याचे चित्र आहे. पूर्वी बैलगाडीने आपल्या शेतात शेणखत घालत. त्यासाठी बैलगाडीला कापसाच्या पळाट्यापासून डालगे तयार केले जायचे. बैलगाडी तसेच बैलांना घुंगरमाळा घालत झेंडे बांधून सजवून गाडी तयार केली जायची व पहाटेपासून या कामाला सुरवात व्हायची.

अलिकडे हे सर्व कालबाह्य झाले असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेणखत घालण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी ट्रॅक्टरचे भाडे, भरण्याची मजुरी, शेणखत शेतात पसरवण्याची मजुरी हे खर्च मात्र वाढले आहेत. अलिकडे नोकर,वाढलेली मजुरी तसेच चारा-पाण्याच्या समस्येमुळे जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून पशुधन घटत आहे. परिणामी सेंद्रिय शेतीसाठी शेणखताची वाणवा होत असल्याचे चित्र आहे. परंतु अलिकडे घटत असलेले पशुधन पाहता तालुक्यात शेणखत कमी झाले आहे. शेणखत मागणी वाढली असून ते महागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला पाहावयास मिळत आहे.

रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनिचा दर्जा खालावत चाललेला आहे.पशुपालन खर्चही वाढत असून चारा पाण्याअभावी शेतकरी पशुधन विक्रीस काढत आहे. शेणखताचे एक ट्रॅक्टरची खरेदी करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. तर ट्रॅक्टरचे भाडे ते भरण्यासाठी मजुरी तसेच ते पसरवण्यासाठी वेगळी मजुरी लागते. सध्या शेतकरी आपल्याकडे असलेला शेणखत घालण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र आहे.

शेतीत चांगला मुरलेला शेणखत घातला तर उत्पादन वाढते. जमिनीची प्रतवारी सुधारते. सेंद्रिय शेतीत शेणखताला महत्व आहे. कृषी विभागामार्फत शेणखताचे महत्व सांगत तशी जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- विशाल इंगळे, कृषी सहाय्यक

शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही चांगले निघते.असा अनुभव असहे. घरी जनावरे ठेवताना चारा-पाण्याच्या तसेच मजुराच्या अडचणी येतात.तर शेणखत विकत घेणे परवडत नाही. अशी स्थिती आहे.

- रामेश्वर टेकाळे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akwan Cyclone Live News : अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार? ताशी १०० किमी वेग, चक्रीवादळ धुमाकूळ घालणार

IND vs NZ: ODI मालिका जिंकली, पण भारतीय संघाला ICC चा मोठा दणका! ठोठावला मोठा दंड, पण का?

Maharashtra Government: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांसाठी ६,८४० कोटींच्या निधीची शिफारस, मंत्री बावनकुळेंनी घेतले महत्त्वाचे निर्णय

Zodiac Sign Benefits: ४०० वर्षांनंतर मंगळ, केतू आणि गुरुची युती! मेष ते कुंभ राशींपर्यंत कोणत्या राशींना मिळणार लाभ?

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT