latur sakal
मराठवाडा

Latur : विरोधी पक्षाचा असल्याने अनुदान नाकारले

आमदार संजय बनसोडे यांचा शिंदे सरकारवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : उदगीर मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शंखी गोगलगाय व अतिवृष्टीचा प्रादुर्भाव झाला. या दोन्ही तालुक्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे मुद्दाम हा मतदार संघ या अनुदानातून वेगळला असल्याचा आरोप आमदार संजय बनसोडे यांनी रविवारी येथे केला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या आठवडी बाजार प्रांगणात आयोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे अध्यक्षस्थानी होते.

सभापती सिध्देश्वर ऊर्फ मुन्ना पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उपसभापती रामराव बिरादार, मादलापूरचे सरपंच उदय मुंडकर, सुभाष धनुरे, प्रा. धनाजी जाधव, संतोष बिरादार, संजय पवार, रणजीत कांबळे, बाजार समितीचे सचिव भगवान पाटील, सहायक निबंधक बाळासाहेब नांदापुरकर, ॲड. पद्माकर उगीले, गजानन बिरादार, गौतम पिंपरे, मोहन गडीकर, चंद्रप्रकाश खटके, कुणाल बागबंदे आदी उपस्थित होते.

आमदार बनसोडे म्हणाले उदगीरची कृषीउत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. योजना मंजूर करण्यासाठी मी मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले.

यावेळी सभापती पाटील म्हणाले उदगीर बाजार समितीच्या वतीने सुरू असलेल्या योजनांसाठी आमदार बनसोडे यांची मोलाची साथ मिळाली आहे. प्रा. नंदकुमार पटणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT