latur Railway news esakal
मराठवाडा

Latur : नांदेड ते लातूर रोड रेल्वेमार्गासाठी उच्च पातळीवर पाठपुरावा करू : व्यंकटेश काब्दे

अहमदपूर येथे मराठवाडा जनता विकास परिषदेची बैठक

सकाळ डिजिटल टीम

अहमदपूर : मराठवाडा जनता विकास परिषदेची बैठक माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १६) घेण्यात आली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, शिवानंद हिंगणे, प्रा.विकास सुकाळे, डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. गंपले, उप प्राचार्य गिरीधर घोरबांड, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, दिलीप गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत बोलताना डॉ. काब्दे म्हणाले की तालुक्यातून जाणारा नांदेड ते लातूर रोड रेल्वेमार्गाची मागणी बऱ्याच वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रश्नासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेचे पदाधिकारी व सदस्य स्थानिक पातळीपासून ते उच्च पातळीपर्यंतच्या कामातील पाठपुराव्याच्या कार्यात आग्रही राहू. तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या नियोजित जागेत उद्योग उभारणीची गरज असून त्याकडेही मराठवाडा विकास परिषदेतील संबधित घटकांनी लक्ष घालाव लागेल.

विकास परिषदेचे सचिव डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी म्हणाले की जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या या परिषदेला समाजातील सर्व घटकांनी मदत करणे गरजेचे आहे.रमाकांत कोंडलवाडे, उमाकांत नरडीले, डॉ. पांडुरंग चिलगर, प्रा. मुज्जमिल सय्यद, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. श्रीशैले मलाशेटे, शरद करकनाळे, मुख्याध्यापक मधुकर मदने, विलास चापोलीकर, गौरव चवंडा, लक्ष्मण फड, गुरूप्पा बावगे, संदीप पाटील, प्रा.दिलीप भालेराव, नंतकुमार चोचांडे, विश्वरूप धाराशिवे, दीपक हेंगणे, संतोष कदम शिवाजी सुर्यवंशी, मनोहर ढेले, राजेश निलेवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : देशातील गर्दीच्या ७ रेल्वे मार्गांचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT