latur  sakal
मराठवाडा

Latur : विध्वंसक कृती रोखली तरच भारताची अखंडता कायम राहिल - नितिन वैद्य

सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. रोजगार निर्मिती न करणारा विकास ही परिस्थीती तरुणांसाठी धोकादायक आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्तरांतील नागरिकांची एकजुट गरजेची असल्याचे ते म्हणाले

सचिन शिवशेट्टे

उदगीर- धार्मिक व स्वांस्कृतीक विविधता हे भारताच्या एकात्मतेचे वैशिष्ट आहे़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यावर विशिष्ट एकच संस्कृती लादण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ हे कट कारस्थान रोखने हे आज घडीला सर्वात मोठे आव्हान आहे़ ही विध्वंसक कृती रोखली तरच भारताची अखंडता कायम राहिल, असे परखड मत राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रसिध्द चित्रपट निर्माते नितिन वैद्य यांनी केले.

डॉ. ना. य. डोळे फाऊंंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार’ रविवारी (ता. पाच ) रघुकुल मंगल कार्यालयात आयोजित भव्य सोहळ्यात नितिन वैद्य यांना प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव, आमदार कपिल पाटील यांनी उदगीर येथे वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान केला.

या प्रसंगी मंचावर माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार शिवराज तोंडचीरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिलाताई पाटील, फाऊंडेशनचे सचिव अजित शिंदे, कोषाध्यक्ष अंकुश गायकवाड, विश्वस्त जशन डोळे हे उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. वैद्य म्हणाले की, सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. रोजगार निर्मिती न करणारा विकास ही परिस्थीती तरुणांसाठी धोकादायक आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्तरांतील नागरिकांची एकजुट गरजेची असल्याचे ते म्हणाले. माध्यमांच्या सध्याच्या वाटचालीबद्दल वैद्य यांनी चिंता व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप करताना आमदार कपील पाटील म्हणाले की, डॉ. ना. य. डोळे यांनी देशभरातील समाजवादी कार्यकर्त्यांना अन्यायाविरुध्द लढण्याची दृष्टी दिली. त्यामुळे उदगीर हे शहर आमच्यासाठी तिर्थक्षेत्र आहे़ सध्याचे विद्वेषाचे राजकारण उलथुन टाकण्यासाठी डॉ. डोळे यांच्या विचाराची आज गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रास्ताविक फाऊंडेशनचे विश्वस्त विनायक चाकुरे यांनी केले तर मानपत्राचे वाचन फाऊंडेशनचे सहसचिव पुरुषोत्तम भांगे यांनी केले. सुत्रसंचलन दिलीप वाघमारे यांनी केले. बापुसाहेब कज्जेवाड, कृष्णा स्वामी, ओम गांजुरे, रविंद्र हसरगुंडे, अशिष राजुरकर, विक्रम हलकिकर, मोतीलाल डोइजोडे, राजकुमार करंजे,

धनाजी आपटे, राजकुमार मोगले, फिरोज देशमुख, अ‍ॅड़ प्रदीप पाटील, अ‍ॅड. पवन कोणे, वसंत बिबिनवरे, प्रमोद भांगे, ओमप्रकाश भांगे, प्रमोद जोशी, राजेंद्र सूर्यवंशी, शिवाजी बिबिनवरे यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमास शहरातील डॉ. ना. य. डोळे यांचे विद्यार्थी, सहकारी, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

SCROLL FOR NEXT