Marathwada Sakal
मराठवाडा

लातूर : UPSC देशात 137 वा आलेल्या कमलकिशोर कंडारकरच्या यशाचा प्रवास

पाच वर्षाच्या अथक प्रयत्नांचे फलित

विकास गाढवे

लातूर : वडील कृषी विभागात नोकरीला असतानाच सरकारी सेवेचे आकर्षण निर्माण झाले. यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण (Education) पूर्ण झाल्यापासूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) (UPSC) परीक्षेची (Exam) तयारी सुरू केली. मागील पाच वर्षात सलग तीन वेळा मुख्य परीक्षेत यश मिळून मुलाखतीसाठी निवड झाली. मात्र, यश आले नाही. शेवटच्या चौथ्या प्रयत्नात यश आल्याने लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया युपीएससीच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत देशात 137 वा आलेल्या येथील कमलकिशोर कंडारकर याची आहे.

मुळचा मुरूड येथील रहिवाशी असलेल्या कमलकिशोरचे वडील कृषी विभागात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर वडील येथे वकील म्हणून काम करत आहेत. कमलकिशोरचे प्राथमिक शिक्षण कळंब (जि. उस्मानाबाद) येथे झाले. माध्यमिक शिक्षण येथील केशवराज विद्यालयात तर दयानंद महाविद्यालयातून त्याने विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने 2015 मध्ये मेकॅनिकल शाखेतून सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेसाठी त्याने समाजशास्त्र हा ऐच्छिक विषय घेतला होता. मागील पाच वर्षात त्याने युपीएससीच्या तीन तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) एक परीक्षा दिली. युपीएससीच्या मुख्य परीक्षेत तो तीनवेळा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरला. मात्र, यश आले नाही. एमपीएससीतही तोच प्रत्यय आला. यंदा त्याने चौथ्यांदा केंद्रीय आयोगाची परीक्षा दिली.

दिल्ली येथे तयारी करत रात्रीचा दिवस करून सराव केला. याच काळात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीही घेतली. मागील प्रयत्नांत झालेल्या चुकांची पुनरार्वृत्ती टाळली आणि यश त्याच्या जवळ आले. मिळालेल्या रँकमधून त्याला भारतीय प्रशासकीय सेवेत संधी मिळणार असून महाराष्ट्र किंवा उत्तरप्रदेश केडरची आशा त्याने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT