latur killari earthquake 30 years sharad pawar work disaster management marathi news  sakal
मराठवाडा

1993 Latur Earthquake : भूकंपग्रस्तांच्या मूलभूत समस्येला वाली कोण?

निवारा मिळाला; कुटुंबांच्या आर्थिक पुनर्वसनाची गरज, प्रशासनाचे दुर्लक्ष

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी  : ३० सप्टेंबर १९९३ च्या प्रलयकारी भूकंपाला शनिवारी ( ता. ३०) ३० वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री खासदार शरद पवार यांनी तत्परता दाखवत भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. ते कौतुकास्पद कार्य होते. त्यानंतर नैसर्गिक घाव घातलेल्या भूकंपग्रस्तांकडे शासनाचे अधिक लक्ष राहील अशी अपेक्षा होती. याउलट घडले. अद्याप मूलभूत गरजांचे पुनर्वसन होणे अपेक्षित आहे. भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी वाली निर्माण झाला नसल्याची खंत आजही आहे.

३० सप्टेंबर १९९३ च्या त्या पाहटे लातूर व धाराशिव जिल्ह्यातील किल्लारीसह बावन्न गावांमध्ये ३.५६ वाजता ६.४ रिस्टर स्केलचा भूकंप झाला. यात हजारो कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. यात नऊ हजारावर नागरिकांचा बळी गेला. शेकडो अपंग झाले. हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. मनुष्य व वित्तहानी, असाह्य वेदना यामुळे नागरिक भयभीत झाले. एकाच सरणावर अनेक मृतांना एकाच वेळी अग्नी देण्यात आला. हे दृश्य पाहिलेल्यांना आजही अंगावर शहारे येतात.

ही नैसर्गिक आपत्ती डोळ्यासमोर ठेवून भूकंपग्रस्त कुटुंबांना सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी होती. बाधित कुटुंबातील एका व्यक्तीस मर्यादित काळामध्ये सरकारी नोकरीत सामावून घेणे बंधनकारक हवे होते. मात्र याउलट घडले. वयोमर्यादा संपूनही लाभ मिळाला नाही. एकट्या किल्लारी गावात भूकंपापूर्वी मोठे डांबरी रस्ते होते.

आज गावांतर्गत ६५ किलोमीटर रस्त्यावर अद्याप मजबुती, डांबरीकरण नाही. न्यायप्रविष्ट घर वगळून उर्वरित घरांना कबाले वाटप नाहीत, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वाटप नाही. शाश्वत पाणी पुरवठा नाही. अशा समस्या आजही आवासून आहेत. ५२ भूकंपग्रस्त गावातील नागरिकांतून प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पोटतिडकीने प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भूकंपग्रस्तांचा शासकीय नोकरीतील अनुशेष भरून काढणे. या नैसर्गिक संकटातून बाहेर काढणाऱ्या सरकारची आजही वाट पहावी लागत आहे. भूकंपग्रस्तांची मुख्य बाजारपेठ किल्लारी आहे. येथे शासकीय सुविधांचा अभाव आहे. सुशिक्षित बेकार, भूमिहीनांच्या हाताला काम मिळण्यासाठी या ठिकाणी एमआयडीसी, आयटी सेक्टर, भूकंपग्रस्तांसाठी एक हजार कोटी रुपयांची विशेष पॅकेज, भूकंपग्रस्तांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, येथून जाणारी रेल्वे, तालुका निर्मिती आदींची गरज आहे.

श्रद्धांजली व बाजारपेठ बंद

भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी होता. येथील नागरिक किल्लारीत मृत्यू झाले होते. शनिवारी (ता. ३०) येथे दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन काळा दिवस पळतात. स्मृतीस्तंभ येथे सकाळी आठ वाजता प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली जाते. यावेळी किल्लारीसह मंगरूळ, गुबाळ, कवठा, राजेगाव, एकोंडी, सास्तुरसह ५२ गावातील ग्रामस्थ सहभागी होतात.

बाधित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अनेक भूकंपग्रस्त लाभार्थ्यांचे मृत्यू झाले. मात्र त्यांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र मिळाले नाहीत. कबाले नाहीत. पुनर्वसनासाठी अधिग्रहण जमिनीची मोजणी करावी यासाठी ठोस निर्णय व्हावा.

-तानाजी सुरवसे, शेतकरी किल्लारी.

अ व ब वर्गातील भुकंपग्रस्त लाभार्थ्यांना नोकरीत प्राधान्याने सामावून घ्यावे.

-रामेश्वर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, लामजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT