Latur Nilanga News
Latur Nilanga News  
मराठवाडा

कोणी न्याय देईल का? चक्क शेतरस्ता १४ शेतकऱ्यांनी मिळून केला गायब, मेहनतीने जपलेला ऊस चालला वाळत

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे अनेकदा पाहिलं. पण केवळ आडमूठेपणामुळं काबाडकष्ट करून सुद्धा नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांना येते. लातूरमधील निलंगा तालुक्यातील भुतमुगळी या गावातील शेतकरी गुणवंत रामतीर्थे व उशाबाई रामतीर्थे यांच्या शेताला असणारा भुतमुगळी ते लिंबाळा पाणंद शेतरस्ता १४ शेतकऱ्यांनी मिळून गायब केला. एकाने तर चक्क पाणंद रस्त्यावरच शेड मारून गोठा तयार केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

त्यावर १४ शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने तळहातावर जपलेला ऊस आता वाळत जात असून उसाला आलेली तोडणी वाटे अभावी परत निघून गेल्यामुळे किमान २ लाख रुपयांचे नुकसान डोळ्यादेखत पाहण्याची वेळ आली आहे. रामतीर्थे यांच्या शेताशेजारील १४ शेतकऱ्यांनी नकाशावर असलेला भुतमुगळी ते लिंबाळा पाणंद शेतरस्त्यावर व भुतमुगळी व लिंबाळामधील शिव रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आता चक्क वाट बंद झाली आहे. यासाठी गुणवंत रामतीर्थे यांनी तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याच्या चकरा मारून चपला झिजवल्या. मात्र यावर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रामतीर्थे यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही.

याउलट त्याच्या मुलावर हल्ला केला गेला. हतबल झालेले रामतीर्थे कुटुंबांना आता डोळ्यासमोर ऊस वाळताना बघत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जगण्याचं साधन असलेल्या शेतात अडीच एकर ऊस जोपासला पण धनदांडग्या शेजारच्या १४ शेतकऱ्यांना शासकीय पाणंद ३३ फुटाच्या शेतरस्त्यावर अतिक्रमण केले असून रस्त्यावर दगड टाकून बंद करण्यात आला आहे. शिवाय एकाने तर चक्क रस्त्यावर घर बांधकाम केले असून आता सतत निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांला शासकीय अधिकारी दाद देऊन भुतमुगळी ते लिंबाळा पाणंद शेतरस्ता अतिक्रमण मुक्त केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत अनेवेळा तहसील व उपविभागीय कार्यालयास खेटे घालून काहीच उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.

भुतमुगळी ते लिंबाळा जाणारा पाणंदरस्त्या नकाशावर असून या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे वाट बंद झाली आहे. हा रस्त्या पुर्वीपासून वहिवाटीत होता. मात्र धनदांडग्या शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता आडवून ठेवल्याने माझ्या शेतातील ऊस कारखाण्याला घालण्यास अडचण होत आहे. त्यामुळे माझे मोठे अर्थिक नुकसान होत असून ऊस जाग्यावरच वाळत आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा याबाबत रस्ता मिळावा म्हणून मागणी केली. मात्र माझ्या मुलास मारहाण करण्यात आली असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे.

- गुणवंत रामतीर्थे, पीडित शेतकरी

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT