jalkot incident
jalkot incident 
मराठवाडा

रानडुक्करांनी केली साडेसहाशे झाडं फस्त, शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): घोणसी ता.जळकोट येथील एका शेतकऱ्यांने शेतात नऊ महिन्यांपूर्वी आंबा, जांब, जांभूळ अशा साडेसाहशे झाडांची लागवड केली होती. पंरतू रानडुक्करांच्या कळपाने बुडासहीत झाडे खाऊन मोठं नुकसान केल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे.

घोणसी ता.जळकोट येथील शेतकरी दिपक बब्रुवान आब्रे यांनी स्वतःच्या गट नंबर ४१३ मध्ये नऊ महिन्यांपूर्वी आंबा ४३०, जांब १३० व जांभूळ शंभर झाडाची तर गोदाजी यांनी पन्नास आंब्याच्या झाडाची लागवड केली होती. नऊ महिन्यांपासून रोपांना खत, ठिंबकद्वारे पाणी देऊन आपल्या पोटाच्या लेकरासारखे जपले होते. शिवारातील ऊस कारखान्याला गेल्यामुळे शिवार उघडे झाल्याने रानडुक्करांना खाण्यासाठी काही उरले नाही. त्यामुळे रानडुक्करांचे कळप आता हिरव्या रोपाच्या मागे लागले आहेत.

दरम्यान दहा महिन्यांपासून रोपाची जोपासणा करुन झाडे गुडघ्याला आली होती. विविध फळांची झाडे लावून कायस्वरूपी उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. पंरतू झाडाला फळ लागण्याच्या आधीच रानडुक्करांनी झाडांची नासाडी करुन रान काळेभोर केले आहे. रानडुक्करांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली असून पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी अशी आशा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

शेतीत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ होत असल्याने कष्ट करूनही पदरात काहीही पडत नाही. शेतीत कायमस्वरुपी उत्पन्न मिळावे यासाठी साडसहाशे विविध फळांची झाडे लावली होती. पंरतू रानडुक्करांच्या कळपाने शेतातील एकही झाड ठेवले नाही. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने रानडुक्करांचा बदोबस्त करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.

-दिपक आब्रे शेतकरी घोणसी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT