ausa news 
मराठवाडा

औसा सार्वजनिक बांधकाम उपविभाग आता लातूर विभागात

हरी तुगावकर

औसा (लातूर): औसा तालुक्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या गावातील सर्वसामान्य जनतेच्या व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने निलंगा येथील औशाचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग आता लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागास जोडला गेला आहे. याबाबत लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीला त्यांनी मान्यता दिली असून, तसे आदेशही शासनाने काढले आहेत.

लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर, रेणापूर तालुक्यासह औसा तालुक्यातील २७ गावांचा समावेश होतो. मतदारसंघातील लातूर व रेणापूर तालुका लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो तर औसा तालुक्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणारी गावे निलंगा बांधकाम विभागांतर्गत येत होती. औसा तालुक्यातील भादा सर्कलमधील २७ गावे लातूर ग्रामीण मतदारसंघात येत असून, या भादा सर्कलमध्ये ३१.२० किलोमीटर लांबीचे राज्य मार्ग, २१.८० किलोमीटर लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण ५३ किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत.

या कामासाठी भादा सर्कलमधील सर्वसामान्य जनतेस व प्रशासनास निलंगा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात व त्यानंतर लातूर येथील जिल्हा मुख्यालयात धावपळ करावी लागत होती. या गैरसोयी टाळण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार आमदार श्री. देशमुख यांनी भादा परिमंडळातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी नागरिकांना होत असलेल्या गैरसोयी, प्रवासासाठी व कामासाठी लागणार अधिकचा वेळ तसेच प्रशासकीय कामकाजातील तांत्रिक अडचणी राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे पत्राद्वारे कळवल्या होत्या.

यामध्ये औशाचा उपविभाग लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जोडण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याबद्दल आमदार श्री. देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे आभार मानले. 

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT