corona updates 
मराठवाडा

Coronavirus: धक्कादायक! वसतिगृहात पाच दिवसांत तब्बल ८७ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

हरी तुगावकर

लातूर: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यात येथील ‘एमआयडीसी’तील एका संस्थेच्या वसतिगृहात गेल्या पाच दिवसांत ८७ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, काल जिल्ह्यातील १४६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

संबंधित वसतिगृहात पाच मार्चला ४१ तर काल ४४ जणांना कोरोनाची लागण झाली. वसतिगृहात २९७ विद्यार्थी असून २२ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १५२ जण बाधित ठरले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात काल एक हजार ४७ जणांच्या आरटीसीपीसीआर चाचण्या झाल्या. त्यात ८६ तर एक हजार २२३ जणाच्या ॲंटीजेन चाचण्यांतून ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २६ हजार २५० वर गेली असून सध्या ८५३ जणांवर उपचार सुरु आहेत. २४ हजार ६८२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

इमारत झाली कोविड केअर सेंटर 
एमआयडीसीतील संबंधित वसतिगृहात सातत्याने विद्यार्थी कोरोना बाधित होत असल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या वसतिगृहाच्या तीन इमारतींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. महापालिकेने तशी कार्यवाही केली असून एका इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

या पुढील काळात विद्यार्थी एकत्र येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना वसतिगृह प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT