jalkot court 
मराठवाडा

अखेर जळकोटच्या कनिष्ठ न्यायालयास मंजुरी, मागील दहा वर्षांपासून सुरु होते ग्राम न्यायालय

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): गेल्या अनेक दिवसापासूनची न्यायालयाची प्रलंबित असलेली मागणी राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने मंजुर केली आहे. जळकोट येथे कायमस्वरूपी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी रोजी दिली.

२६ जून १९९९ ला जळकोट तालुक्याची निर्मिती झाली मात्र न्यायालय सुरू झाले नव्हते.  औरंगाबाद उच्च न्यायालयाने गेल्या दहा वर्षांपूर्वी आठवड्यातून एक दिवस ग्राम न्यायालय सुरू केले होते. मात्र तालुक्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट होती.अनेकांना न्यायालयाच्या कामासाठी उदगीर, अहमदपूर, याठिकाणी खेटे मारावे लागत होते.

याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मन्मथ किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, गोपाळकृष्ण गबाळे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कायमस्वरूपी कनिष्ठ न्यायालय सुरू व्हावे अशी मागणी केली होती. अखेर राज्यमंञी श्रि.बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन जळकोटला अखेर कनिष्ठ न्यायालय मंजूर झाले.

मंजुरीची बातमी कळताच जळकोट तालुक्यातील ४७ गावच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेताब बेग, सरपंच शिरीष चव्हाण, गोपाळ कृष्ण गबाळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, रूक्‍मीनबाई जाधव शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, नगरसेवक महेश धुळशेट्टे, खादर लाटवाले अँड. श्याम गवळे ,अँड तात्यासाहेब पाटील, ॲड भगवान पाटील, फिरोज पटेल, श्रीनिवास मंगनाळे ऍड टाकळे, सूर्यवंशी यांनी राज्यमंत्री  संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी महामुकाबला; कधी, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

SCROLL FOR NEXT