chakur 
मराठवाडा

सभापती व उपसभापतीविरुध्द अविश्वास ठराव बारगळला; सर्व सदस्यांची अनुपस्थिती

प्रशांत शेटे

चाकुर (लातूर): भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती विरूध्द भाजपच्याच सहा सदस्यांंनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (ता.२६) विशेष सभा बोलविण्यात आली होती यासभेला एकही सदस्य उपस्थित नाही राहिल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळा आहे.

पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी बारा वाजता बैठक बोलविण्यात आली होती. सभापती जमुना बडे व उपसभापती सज्जन लोणावळे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत, पंचायत समितीच्या विकास कामात दोघेंही हेतुपरस्पर अडथळा निर्माण करीत आहेत, इतर सदस्यांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे यामुळे त्यांच्या विरोधात पंचायत समिती सदस्य महेश वत्ते, सरीता मठपती, सुनिता डावरे, विद्याताई शिंदे, उमादेवी राजेमाने, वसंत डिगोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.

अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सर्व सदस्य बाहेरगावी सहलीला गेले होते. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे या अविश्वास ठरावाच्या बैठकीला एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. त्यामुळे सभापती व उपसभापतीविरूध्दचा ठराव फेटाळण्यात आला आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, सहायय्क गटविकास अधिकारी आकाश गोकनवार, विस्तार अधिकारी एकनाथ बुआ आदी उपस्थित 
होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT