Udgir Corona Updates  
मराठवाडा

उदगीर शहरात आता व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : उदगीर शहरातील सर्व आस्थापनांच्या व्यावसायिकांना व त्यात काम करणाऱ्या नोकरांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.रविवारी (ता.२१) पर्यंत या चाचण्या नाही केल्यास संबंधित अस्थापना बंद करून दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी कडक निर्बंध घालून दिले आहेत. रात्री आठ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे.

मात्र नागरिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
शहरातील सर्वच बाजारपेठेमधील व्यावसायिकांना व त्यात काम करणाऱ्या नोकरांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. सर्वांनी तपासण्या करून घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट आपल्या दुकानात दर्शनी भागावर लावून ठेवावे असे, आवाहन नगरपालिकेच्या वतीने श्री.राठोड यांनी गुरुवारी (ता.१८) पत्राद्वारे केले आहे.


सोमवारपासून महसुल, पोलिस व नगरपालिका विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी करत असताना तपासणी केली नसल्याचे आढळल्यास अशा संबंधित व्यावसायिकांची दुकाने बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

आठवडे बाजार सुरूच....
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेऊन तसे आदेशही काढले. परंतु गुरुवारी  येथील आठवडे बाजार सुरूच असल्याचे दिसून आले. येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शेजारी असलेल्या शेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर शेळ्यांची, कोंबड्यांची व इतर घटकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. त्यानंतर उशिरा नगरपालिकेचे अधिकारी तेथे दाखल झाले व बाजारावर निर्बंध घालण्यात आल्याचे सांगून तो बाजार बंद करावयास लावला.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT