latur sakal
मराठवाडा

लातूर जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता; राजकीय हालचालींना वेग

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव यांनी सोमवारी (ता. २७) बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यादी अंतिम झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी नेत्यांचा संपर्क वाढवला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी मे महिन्यात संपली असून, त्यापूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी प्रारूप मतदार यादीचे काम हाती घेताच कोरोना व अन्य कारणांमुळे निवडणुका तसेच यादीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. यातूनच तब्बल दीड वर्षानंतर प्रारूप मतदार यादी तयारी होऊन तीन सप्टेंबरला ती प्रसिद्ध करण्यात आली. यादीवर १३ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. तब्बल ६४ दावे व हरकती दाखल झाल्या होत्या. त्यांची सुनावणी घेऊन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी जाधव यांनी काही संस्थांच्या प्रतिनिधींना अपात्र ठरवले तर काही संस्थांच्या प्रतिनिधींची नावे नव्याने यादीत दाखल केली. यातूनच प्रारूप यादीच्या तुलनेत चार मतदारांत वाढ झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT