latur news latur news
मराठवाडा

Latur Lockdown: लातुरात कडक लॉकडाउन तीन दिवसांनी वाढवला

लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; रविवारी रात्रीपर्यंत ‘वीकेंड’प्रमाणेच निर्बंध

सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनमध्येच (Latur lockdown updates) जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आठ मेपासून सहा दिवसांचा वीकेंड लॉकडाउनप्रमाणे कडक लॉकडाउन जिल्ह्यात लागू केला होता. त्याचे दृश्य परिणाम चांगले दिसून आले. या लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या कमी झाली (covid 19). यामुळे हा लॉकडाउन आणखी तीन दिवस वाढवण्याचा निर्णय पृथ्वीराज यांनी घेतला असून तो रविवारपर्यंत (ता. १६) कायम राहणार आहे. वीकेंड लॉकडाउन प्रमाणेच या काळात सर्व निर्बंध असल्याने कडेकोट बंद राहणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाउन लागू करताना सरकारने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार दोन दिवस कडक निर्बंध लागू केले होते. हा वीकेंड लॉकडाउन एका आठवड्यापुरताच राहिला. सरकारने त्यानंतर स्वतंत्र कडक निर्बंधांचा लॉकडाउन घोषित केला. मात्र, लॉकडाउनमध्ये वीकेंड लॉकडाउनसारखे आणखी कडक निर्बंध नव्हते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी मात्र सरकारने बंद केलेला वीकेंड लॉकडाउन जिल्ह्यात सुरूच ठेवला. या लॉकडाउनसारखाच जिल्ह्यात आठ मेपासून सहा दिवसांचा लॉकडाउन लागू केला.

या लॉकडाउनची मुदत गुरूवारी (ता. १४) रात्री संपत होती. यामुळे शुक्रवारपासून (ता. १४) लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळण्याची आशा सर्वांना होती. मात्र, जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी गुरुवारी दुपारीच या लॉकडाउनमध्ये आणखी तीन दिवसांची वाढ केल्याची जाहीर केले. सहा दिवसाच्या वीकेंडसारख्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाल्याचे दिसत आहे. यामुळे ही साखळी आणखी तोडण्यासाठी तीन दिवसाचा वाढीव लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूची होम डिलेव्हरी करण्यास परवानगी असून, या वस्तूंच्या खरेदीचे निमित्त करून नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT