manjara factory sakal
मराठवाडा

लातूर : ‘मांजरा’ने शंभरचा हप्ता देऊन तोंडाला पाने पुसली

क्रांतिदिनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर मांजरा, विकास आणि रेणा कारखान्‍याने प्रतिटन शंभर रुपयांच्‍या जवळपास उसाचे बिल शेतकऱ्यां‍च्‍या बँक खात्‍यात जमा केले.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : गाळप केलेल्‍या उसाला एफआरपीप्रमाणे फरकाची रक्‍कम द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी असताना मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी शंभर रुपयांचा दुसरा हफ्ता देऊन शेतकऱ्यांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाल्‍याने बुधवारी (ता. एक) मांजरा कारखान्याचे संस्‍थापक अध्यक्ष बब्रुवान काळे यांच्या चिखुर्डा (ता. लातूर) येथे समाधी स्‍थळावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्‍याची माहिती भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेश कराड यांनी दिली.

एफआरपीनुसार फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्‍यात जमा करावी या मागणीसाठी ता. ९ ऑगस्‍टला क्रांतिदिनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर मांजरा, विकास आणि रेणा कारखान्‍याने प्रतिटन शंभर रुपयांच्‍या जवळपास उसाचे बिल शेतकऱ्यां‍च्‍या बँक खात्‍यात जमा केले. मांजरा परिवारातील मांजरा साखर कारखान्‍याची मूळ एफआरपी तीन हजार ४२२ रुपये इतकी आहे. तोडणी, वाहतूक ६४७ रुपये वगळता २ हजार ७७५ रुपये शेतकऱ्यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. उसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता दोन हजार दोनशे रुपये देण्‍यात आला.

उर्वरित ५७५ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना देणे असताना केवळ १०९ रुपये देण्‍यात आले. विकास साखर कारखान्‍याची मूळ एफआरपी ३ हजार ३३१ रुपये इतकी असून तोडणी, वाहतूक ६३२ रुपये वगळता २ हजार ६९९ रुपये शेतकऱ्यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. उसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता २ हजार २०० रुपये देण्‍यात आला. उर्वरित ४९९ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना देणे असताना केवळ शंभर रुपये देण्‍यात आले. तर रेणा साखर कारखान्‍याची मूळ एफआरपी ३ हजार ४८२ रुपये इतकी असून तोडणी, वाहतूक ६२६ रुपये वगळता २ हजार ८५६ रुपये शेतकऱ्यांना प्रतिटन भाव देणे बंधनकारक आहे. उसाचे गाळप केल्‍यानंतर पहिला हफ्ता २ हजार २०० रुपये देण्‍यात आले. उर्वरित ६५६ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना देणे असताना केवळ शंभर रुपये देण्‍यात आले आहेत, अशी माहिती श्री. कराड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2026-27: बीडच्या ३ खेळाडूंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड! मैदानात कधी उतरणार? जाणून घ्या...

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

Reliance Jio: भारतात येणार 6G नेटवर्क! इंटरनेटसंबंधी 'रिलायन्स जिओ'चं मोठं अपडेट; पाचपट वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार

एका मृत्यूभोवती गुंफलेलं गूढ, संशयाचं जाळं अन् अनपेक्षित वळणं; अजय पुरकरांचा ‘केस नं. ९९’ येतोय ओटीटीवर

SCROLL FOR NEXT