Latur Mayor Latur Water Issue
Latur Mayor Latur Water Issue  
मराठवाडा

महापौरांनी घेतले अभियंत्यांना फैलावर, एक कोटीचा भरणाच नाही

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः थकबाकीसाठी लातूरचा पाणीपुरवठ्याची वीज तोडणाऱ्या महावितरणने दीड वर्षांपासून एक कोटी रुपये थकवल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्याची वाट लावून महावितरणने एक कोटी रुपये ना वीज बिलातून वळती केले ना महापालिकेला भरले. यामुळे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महावितरणच्या अभियंत्यांना सोमवारी (ता.२४) फैलावर घेतले. यात खडाजंगीही झाली. शेवटी महावितरणच्या अभियंत्यांना नमते घ्यावे लागले. एक महिन्याची थकबाकी भरल्यानंतर मंगळवारी (ता.२५) पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा सुरू करण्याचा निर्णय यावेळी झाला.


महावितरणने वीजबिलाच्या थकबाकीसाठी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या सर्वच योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. याला सोमवारी सात दिवस झाले आहेत. सध्या शहराला दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात महावितरणने वीज तोडून त्यात दुष्काळात तेरावा महिना आणला. त्यामुळे गेल्या सतरा दिवसांपासून शहरात निर्जळी आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना विनंती करूनही ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे सात दिवस वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.


महावितरणची ताठर भूमिका पाहून महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महावितरणकडून येणे बाकी किती आहे, हे काढण्याच्या सूचना दिल्या. यात महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर महावितरणकडून २०१८ मध्ये केबल टाकण्यात येणार होते. या करीता महापालिकेकडून परवानगीची गरज होती. या करीता महापालिका रस्ता दुरुस्ती दर आकारले.


यात महावितरणने ३१ लाख एक हजार तीनशे रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला होता. उर्वरीत एक कोटी रुपये पाणी पुरवठ्याच्या तसेच वीजबिलाच्या थकबाकीतून वळती करून घ्यावेत या अटीवर महापालिकेने महावितरणला केबल टाकण्याची परवनगी दिली होती. त्यानंतर महावितरणने शहरात ठिकठिकाणी केबल टाकत हे सर्व काम पूर्ण केले. यात रस्त्याची मात्र वाट लागली होती. यात महावितरणने महापालिकेला एक कोटी रुपये तर दिलेच नाहीत पण पाणीपुरवठा किंवा पथदिव्यांच्या वीज बिलातूनही वळती केले नाहीत. दीड वर्षापासून एक पैसाही महावितरणने महापालिकेला भरलेला नाही. तसेच एक कोटी रुपये थकवले आहेत. ही माहिती समोर आली. त्यानंतर सोमवारी श्री. गोजमगुंडे व श्री बिराजदार यांनी महावितरण गाठले. तेथे अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. बराच वेळ चर्चा झाली. यात खडाजंगीही झाली. वीज बीलातून एक कोटी वळती करावे अन्यथा पैसे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. यावर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून निर्णय घेतला जाईल असे त्यांना सांगण्यात आले. तसेच एक महिन्याचे बील भरल्यांतर पाणी पुरवठ्याची वीज सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


महावितरणकडे एक कोटी रुपये थकले आहेत. त्यांनी वीज बिलातून वळती करणे आवश्यक होते. पण तसे न करता थकबाकीसाठी पाणी पुरवठ्याची वीज तोडली आहे. स्वतःकडील पैसे थकवायचे अन दुसऱयावर कारवाई करायची हे चुकीचे आहे. अभियंत्यासोबत बराच वेळ चर्चा झाली. खडाजंगीही झाली. पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT