Viral Video Sakal
मराठवाडा

Video Viral : सरकारी रूग्णालयातील धक्कादायक प्रकार! रूग्णाला चक्क सुरक्षारक्षकाने दिले इंजेक्शन

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लातूर : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रूग्णाला चक्क सुरक्षारक्षकाने इंजेक्शन दिल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकाराचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

अधिक माहितीनुसार, लातूरमधील रेणापूर तालुक्यातील शब्बीर शेख नावाचे व्यक्ती अपघातात जखमी झाले होते त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णाला डॉक्टरने चेक केले आणि नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितले.

पण नर्सने सदर रूग्णाला इंजेक्शन न देता सुरक्षारक्षकाला सांगितले. सुरक्षारक्षकाने त्याच्यावर उपचार करण्यास सुरूवात केल्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला पण सुरक्षारक्षकाने त्याच्यावर उपचार करणे चालूच ठेवले.

दरम्यान, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सदर सुरक्षारक्षक आणि नर्सला डॉक्टरांनी चांगलंच झापलं आहे. तर याप्रकरणी अधिक तपासणी करण्याचे आश्वासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT