Latur Accident News esakal
मराठवाडा

Latur : लातूरमध्ये बस-दुचाकीची समोरासमोर धडक, बाप-लेकाचा मृत्यू

प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

केतन धवन

उजनी (जि.लातूर) : औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उजनी मोड येथे कर्नाटक राज्यातील बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.२५) दुपारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणमंत जगताप (वय ६५) आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर जगताप (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. ते भातागळी (जि. उस्मानाबाद) येथील रहिवाशी असून सोमवारी उस्मानाबादहून दोघेही दुचाकीवरून (एमएच २५ झेड ४५३८) गावाकडे (Latur) परतत असताना कर्नाटक राज्यातील लातूर-तालिकोट या बसची (केए २८ एफ २४५४) त्यांच्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. येथील प्राथमिक (Accident In Latur) आरोग्य केंद्रात दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास भादा पोलिस करित आहेत.

महामार्गावरील वाहतुकीचे नियम धाब्यावर

दरम्यान सोलापूरच्या दिशेने जाणारी ही बस उजनी मोडवरील हॉटेलवर नाष्टा करण्याच्या हेतूने थांबा घेण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडत चुकीच्या दिशेने जात होती. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. अशा पद्धतीने अनेक वाहने या महामार्गावरील वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक करत आहेत. यामुळे असे अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याकडे महामार्ग व वाहतूक प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT