jalkot well 
मराठवाडा

जिल्हा परिषदेकडे विहीरींचे प्रस्ताव रखडले; 20 हजार मजूर कामाच्या प्रतिक्षेत

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): तालुक्यातील ४७ गावांतील विहीरीचे एकशे पंधरा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. यातील पन्नास विहिरींना मंजुरी मिळाली असून ६४ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मान्यतेविना प्रलंबित आहेत. या विहिरींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात मजुरांची संख्या २५ हजार असून सध्या शिवार उघडे पडल्याने मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. कामाच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे. पंचेवीस हजारा पैकी केवळ साडे सातशे खजुराच्या हाताला काम आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने प्रत्येक शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढावे या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी देण्याचे ठरविले आहे.

हा प्रस्ताव येताच मंजुरी देण्याचेही आदेश दिले आहेत. पंरतु ६४ विहिरीचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना प्रत्येक विहीरीसाठी तीन लाख रुपये अनुदान आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत मंजुरी मिळताच संबंधित पात्र लाभार्थ्यांना विहीर खोद कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात संपुर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषद व संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतील- चंद्रहार ढोकणे गटविकास अधिकारी पं.स.जळकोट

जळकोट पंचायत समितीकडून विहीरीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या संबधित विभागाकडे आले आल्यास याबाबत तात्काळ विचारणा करुन मंजूर करण्यात येतील. मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कामांना मंजुरी देण्यात येत आहे.-राहुल केंद्रे अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT