मराठवाडा

बचत गटाचा हक्काचा पत्ता बनलाय वाळूचा धक्का!

धोंडोपंत कुलकर्णी

हडोळती - महिला बचत गटाचे हक्काचे तालुका विक्री केंद्र असलेली हडोळतीतील वास्तू वाळू विक्रीचा धक्का बनली आहे. पंचायत समितीकडे हस्तांतर होऊनही वापराविना इमारतीची दुरवस्था होत आहे. 

महिला सक्षमीकरणासाठी लघुउघोग केंद्रातर्फे महिला बचत गटाची उत्पादने व विक्री व्यवस्थेसाठी तालुक्‍याच्या विक्री केंद्राची इमारत हडोळतीला झाली. इमारतीसाठी पहिल्या टप्यात पंधरा लाख रुपये खर्च झाला. तीन वर्षांपूर्वी तयार झालेली वास्तू पंचायत समितीकडे हस्तांतरितही झाली. वास्तूचे उद्‌घाटन होण्याआधीच दुसऱ्या टप्यातील दुसऱ्या मजल्यासाठी दहा लाख रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला. ग्राउंड फ्लोअरला असलेल्या इमारतीत २० गाळेही तयार झाले आहेत. तालुक्‍यात ४२० महिला बचत गट कार्यरत आहेत; मात्र एकाही बचत गटाने या इमारतीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दिला नाही. तालुक्‍याला जागा नसल्याने हडोळती ग्रामपंचायतीच्या जागेवर वास्तू झाली; मात्र मालकी हक्क येथील ग्रामपंचायतीला न मिळता पंचायत समितीकडे हक्क अबाधित राहिला. ग्रामपंचायतीने या वास्तूचा हक्क आपल्याकडे ठेवून घेतला असता तर उत्पन्नाचा नवा स्रोत निर्णाण झाला असता. पहिल्याच मजल्यावरील गाळ्यांसाठी कोणी तयार होत नसताना दुसऱ्या मजल्यासाठी बांधकाम प्रस्तावाची घाई झाली. सदर इमारत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असून तिची दुरवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. 

४२० बचत गट
महिला सक्षमीकरणासाठी शासन महिला बचत गटांसाठी विविध उपाययोजना करीत आहे. या गटांना व्यवसायासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही कर्ज प्रकरणे कोटीच्या घरात आहेत. तालुक्‍यात ४२० महिला बचत गटांची संख्या असतानाही येथील बचत गटाच्या विक्री केंद्रावर एकाही महिला व्यावसायिकांना उत्पादनांचा स्टॉल उभारता आला नाही. यामुळेच ४२० गट खरे की खोटे याविषयी शंका व्यक्त होत आहे.

महिला बचत गटाच्या विक्री केंद्रात बचत गटाच्या उत्पादित मालाच्या विक्रीची हमी नाही. शासनाने या केंद्रावर बचत गट व शहरातील मॉल सेंटर यांच्यात समन्वय अधिकारी नेमल्यास फायदा होणार आहे. या केंद्रावर कोणत्याही सुविधा नाहीत. महिलांना केंद्रावर विक्रीसाठी लागणारा माल कोणत्या स्वरूपात असावा याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
- गोदावरी पवार, अध्यक्षा, एकता महिला बचत गट, हडोळती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT