latur sakal
मराठवाडा

Latur News : जलसाक्षरता रॅलीतून जनतेची दिशाभूल-अशोकराव पाटील निलंगेकर

जिल्ह्यातच नव्हेतर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी जलस्रोत निर्माण केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निलंगा - केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना निलंगा विधानसभेचे आमदार माजी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपले राजकीय वजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जवळ वापरून पाण्याच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घ्यावा जिल्हाभर जलसाक्षरता रॕली काढून जनतेची दिशाभूल थांबवावी अशी टीका काका अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुतणे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमुद केले आहे की, मराठवाड्याला चार मुख्यमंत्री मिळाले मात्र पाण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत असा आरोप जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून संभाजीराव पाटील निलंगेकर करत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनाचे जनक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लोअर तेरणा धरणाच्या माध्यमातून निलंगा शहराला पिण्याचे पाणी आणले. ८५ किमीचा डावा व उजवा कालवा आणला.

जिल्ह्यातच नव्हेतर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी जलस्रोत निर्माण केले आहेत. यामध्ये जायकवाडी, विष्णुपुरी, माजलगाव येथील सिंदफणा धरण, तेरणा, मांजरा, गोदावरी, आदी नदयांवर अनेक ठिकाणी बॅरेजेस बांधून जल- सिंचनाची सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या.

लातूर जिल्ह्यात तावरजा, धनेगाव, घरणी, मसलगा, गिरकचाळ, साकोळ अशा विविध ठिकाणी बॅरेजस निर्माण करून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. लातूर शहराला पाणीच आणायचे असेल तर स्व. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना उजनी धरणातून लातूरला १२ टीएमसी पाणी आणण्याचे निश्चित केले होते. ते आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

कै. निलंगेकर साहेबांनी आपल्या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणची सर्व कार्यालय निलंगा येथे आणली होती.

शेतकऱ्यांना मदत द्या

दोन आमदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे तालुक्यातील कार्यालये पळवली जात आहेत. सध्या मतदारसंघात दुष्काळ पडला आहे. पाऊस पडत असल्याने खरीपातील पिक नष्ट होऊन शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT