latur sakal
मराठवाडा

Latur News : प्रशंसनीय सुविधासह लातूर रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

‘अमृत ​​भारत’ योजनेमध्ये समावेश, लोकांकडून मागविल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

लातूर - भारतीय रेल्वेनेस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या उद्देशाने अमृत भारत स्थानक योजना सुरु केली आहे. या योजनेत लातूरच्या स्थानकाचा समावेश झाला आहे. हे स्थानक कशा पद्धतीने विकसित करावे, यासाठी रेल्वेने लोकांकडून सूचना मागविल्या आहेत.

केंद्र शासनाची ही महत्वाकांक्षी योजना असून रेल्वे स्थानके विकसित केली जात आहेत. योजनेचा एक भाग म्हणून फलाटावर सुधारणा, फलाटांच्या आच्छादनाचा विस्तार, स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये सुधारणा,प्रदक्षिणा क्षेत्रामध्ये सुधारणा, बारा मीटर रुंद ‘एंड-टू-एंड फूट ओव्हर ब्रिज’, प्रकाश व्यवस्था आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेसे फर्निचर, सरकता जिना, लिफ्ट आदी सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. ही कामे करताना कार्यक्षम ऊर्जा, जलसंधारण आदी उद्देश साधताना उत्कृष्टतेसह टिकाऊपणाच्या घटकांवर लक्ष दिले जाणार आहे. कचरा व्यवस्थापन, इमारत व्यवस्थापनाला महत्त्व दिले जाणार आहे.

‘अमृत ​​भारत’मध्ये सोलापूर रेल्वे विभागात पंधरा स्थानके विकसित होणार आहेत. त्यात लातूर स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे स्थानक शहराच्या विकासाचा एक भाग व्हावा, लोकांचाही सहभाग असावा यासाठी रेल्वेने सूचना मागविल्या आहेत.

लातूरसह १५ स्थानकाचा विकास

सोलापूर विभागातील या रेल्वे स्थानकांचा विकास होणार ः सोलापूर, दौंड, पंढरपूर, वाडी, अहमदनगर, कुर्डुवाडी, कलबुर्गी (गुलबर्गा), कोपरगाव, शहाबाद, उस्मानाबाद, लातूर, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी आणि जेऊर.

सूचनांसाठी आवाहन

लातूर रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी नागरीकांना तीन ऑगस्टपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. drmoffice2011@gmail.com किंवा cprooffice0@gmail.com या मेल आयडीवर किंवा @drmSplapur या ट्विटर अकाउंटला #AmritBharat_Latur असा हॅशटॅग वापरून सूचना पाठवाव्यात, असे आवाहन रेल्वेने ३१ जुलैच्या एका पत्राद्वारे केले आहे.

लातूर स्थानकाच्या आधुनिकीकरणात नागरिकांच्या सूचना मागविण्याचा रेल्वेचा उपक्रम प्रशंसनीय आहे. रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष, दिव्यांगांसाठीच्या रॅम्पमध्ये सुधारणा, लहान मुलांसाठी मनोरंजन कक्ष, स्थानिकांसाठी कलादालन, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मार्ग, पार्किंग, प्रवेशद्वार, ज्येष्ठांसाठी सुविधा आदी कामांवरही भर देता येईल.

- विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT