manjara dam water storage rise  Sakal
मराठवाडा

Latur Water Storage : ‘मांजरा’च्या १२५ किलोमीटर पात्रात पाणी; होसूरच्या उच्च पातळी बंधाऱ्यातून कर्नाटकात विसर्ग

मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात चांगले पाणी आले आहे. या नदीपात्रात असलेल्या पंधरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र, मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात चांगले पाणी आले आहे. या नदीपात्रात असलेल्या पंधरा उच्च पातळी बंधाऱ्याच्या प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

नदीपात्रात शेवटचा होसूर बंधारा आहे. हा बंधारा सतत भरत असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आतापर्यंत या बंधाऱ्यातून ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा कर्नाटकात विसर्ग करण्यात आला आहे.

३२ दशलक्ष घनमीटर साठा

मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात १५ उच्चपातळीवरील बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा ६४.८४६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या या बंधाऱ्यात एकूण पाणीसाठा ३२.८९ दशलक्ष घनमीटर इतका आहे. याची टक्केवारी ५०.७३ इतकी आहे.'

दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग

काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी येत आहे. नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच बंधाऱ्यांचे एक दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्र पाण्याने भरले जात आहे.

कर्नाटकात सोडले पाणी

होसूर येथे मांजरा नदीच्या पात्रातील शेवटचा उच्चपातळी बंधारा आहे. या बंधाऱ्याचा प्रकल्पीय पाणीसाठा २.२५० इतका आहे. तो सातत्याने भरला जात आहे. त्यामुळे त्याचे दरवाजे उघडून पाणी नदीत सोडले जाते. आतापर्यंत ९६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी कर्नाटकात गेले आहे.

बंधाऱ्यातील पाण्याची स्थिती (दलघमीत)

बंधारा - जलसाठा- सध्याचा साठा - टक्केवारी

  • लासरा - ३.००० - १.१३६ - ३७.८७

  • वांजरखेडा -३.६०० -२.०५२ -५७.००

  • टाकळगाव - १.९१६ -०.९७५ - ५०.८९

  • वांगदरी- ०.८४३- ०.३०५ -३६.१८

  • कारसा पोहरेगाव -३.४१० - १.३०६ - ३८.३०

  • साई -३.४७० -१.७८२ -५१.३५

  • नागझरी - ३.४८६ - १.७६९ -५०.७५

  • शिवणी - ९.८१० -५.१४३ -५२.४३

  • खुलगापूर- ९.७०८- ३.६२९ -३७.३८

  • बिंदगीहाळ - १.३५० -१.०२८ -७६.१५

  • डोंगरगाव - ७.९०२ - ४.२३९ -५३.६५

  • धनेगाव - ११.१०१ -७.०८५ -६३.८२

  • होसूर -२.२५० - १.३२५ -५८.८९

  • भुसणी- १.४९० -१.१२० -७५.१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT