crime sakal
मराठवाडा

अपहरण केलेल्या १३ तरुणींची,आठ बालकामगारांची मुक्तता

लातूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा

लातूर : लातूर पोलीस दलात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची पोलिसांनी अपहरण केलेल्या 13 तरुणींची,8 बालकामगारांची मुक्तता केली आहे. लातूर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाची नुकतीच स्थापना केली आहे. याद्वारे बेकायदेशीरपणे महिला तरुणींना चुकीचे काम करायला लावणाऱ्यावर कारवाई करून त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

या कक्षाच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात कक्षाचे प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या टीमने सायबर सेलच्या मदतीने, लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अपहरणच्या 13 गुन्ह्यांची उकल करून राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करून एकूण 13 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच अनैतिक व्यवसायाशी संबंधित 6 तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे .

अनेकदा इतर राज्यातून, दुसऱ्या देशातून तरुण मुलींना पळवून आणले जाते व त्यांना शरीरविक्रीयाच्या धंद्यात ढकलले जाते.तर अनेकदा तरुण मुलींचे अपहरण करून त्यांना इतर भागात पाठविले जाते.चुकीचे पासपोर्ट, कागदपत्र बनवून स्त्रिया किंवा पुरुषांना बेकायदेशीर रित्या कामाला लावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी लातूर पोलिसांनी "अँटी ह्यूमन ट्राफिकिंग कक्ष" स्थापन केला आहे.

सदरच्या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी महिला पोलीस अंमलदार वंगे, लता गिरी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार हे कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT