soyaben sakal
मराठवाडा

Latur : सोयाबीन संशोधन केंद्राची आशा मावळली; देशाचे सोयाबीन हब असलेल्या लातूर जिल्ह्याला कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ठेंगा

लातूर जिल्ह्याने देशाला देवणी व नांदेड जिल्ह्याने लालकंधारी हे दोन गोवंश दिले. महाराष्ट्रात या दोनच जिल्ह्यांत या गोवंशाची संख्या ७० ते ७५ टक्के आहे.

हरी तुगावकर -सकाळ वृत्तसेवा

लातूर - जिरेवाडी (ता. परळी) येथे सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करुन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देशाचे सोयाबीन हब असलेल्या लातूर जिल्ह्याला ठेंगा दाखवला आहे. लालकंधारी, देवणी गोवंश संवर्धन केंद्र पाठोपाठ त्यांनी आता हे सोयाबीन संशोधन केंद्रही पळवले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे दोनही केंद्र महत्त्वाची होती. असे असताना देखील कृषीमंत्री होताच अवघ्या तीन महिन्यांत मुंडे यांनी लातूरसाठी महत्त्वाची राहणारी हे दोनही केंद्र नेली आहेत. त्यामुळे आता लातूर येथे हे केंद्र स्थापन होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

लातूर जिल्ह्याने देशाला देवणी व नांदेड जिल्ह्याने लालकंधारी हे दोन गोवंश दिले. महाराष्ट्रात या दोनच जिल्ह्यांत या गोवंशाची संख्या ७० ते ७५ टक्के आहे. असे असताना देखील काही दिवसांपूर्वीच मुंडे यांनी या गोवंशाचे संवर्धन केंद्र अंबाजोगाईला नेले. तसे आदेशही त्यांनी काढले. या पाठोपाठ सोयाबीन संशोधन केंद्र जाणार हे गृहित होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच परळी वैजनाथ तालुक्यातील जिरेवाडी येथे सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. या करिता जिरेवाडी येथील शासकीय जमीन गट क्र. ३९६ मधील ६१ हेक्टर ९९ आर पैकी २० हेक्टर जमीन ही या केंद्राला देण्यात आली आहे.

खरे तर लातूर जिल्हा हा देशाचे सोयाबीनचे हब आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात देशातील क्रमांक दोनवरचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी सोयाबीनची पेरणी होत आहे. इतकी मोठ्या प्रमाणात पेरणी कोणत्याही जिल्ह्यात होत नाही. तसेच २० पेक्षा अधिक सॉलव्हन्ट प्लॅन्ट लातूर जिल्ह्यात आहेत. देशातील विविध राज्यांत येथून सोयाबीन तेलाचा पुरवठा केला जातो. यातूनच दादा भूसे हे कृषीमंत्री असताना त्यांनी येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद घेतली. येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचे जाहीरही केले होते. पण, फाइल पुढे सरकली नाही. तीन महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे कृषीमंत्री झाले आणि त्यांनी लातूरला ठेंगा दाखवत हे संशोधन केंद्र पळवले. त्यामुळे आता येते सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

आकडे बोलतात...(२०२२-२३ मधील आकडेवारी)

देशात सोयाबीनचे क्षेत्र : १२०.९० लाख हेक्टर

महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र : ४९.०९ लाख हेक्टर

मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र : २४.८७ लाख हेक्टर

बीड जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र : तीन लाख हेक्टर

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र : पाच लाख हेक्टर

सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट अन् विरोधकही गप्पच

माजीमंत्री, आमदार अमित देशमुख (काँग्रेस), माजीमंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) व क्रीडामंत्री संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) या तीघांकडे लातूर जिल्ह्याचे नेतृत्व आहे. धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा देवणी गोवंश संवर्धन केंद्र पळवले. त्या पाठोपाठ सोयाबीन संशोधन केंद्र पळवले तरी या तिघांनी त्याला कडाडून विरोध केल्याचे दिसले नाही.

राज्य मंत्रिमंडळात संजय बनसोडे आहेत, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे. ते काहीच बोलत नाहीत. तोंडावर बोट ठेवून ते गप्प आहेत. तर दुसरीकडे अमित देशमुख हे विरोधी पक्षात आहेत. तरी देखील ते या प्रश्नावर आवाज उठवता दिसून आले नाहीत. या तीनही नेत्यांची काय अडचण आहे, हे मात्र लातूरकरांना कळत नाही. वाढप्या ओळखीचा असला की विकास होतो, हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे विधान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरे करुन दाखवले आहे. लातूरचे प्रतिनिधी आता काय करणार, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT