latur racewalk
latur racewalk  
मराठवाडा

उदगीरची तनिषा केंद्रे राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

सचिन शिवशेट्टे

उदगीर (जिल्हा- लातूर ) ः सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेतील 17 वर्षे वयोगटातील रेसवॉक या क्रिडा प्रकारात तनिषा सुरेश केंद्रे ने पहिला क्रमांक मिळवत यश प्राप्त केले.  


 राज्यसरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शालेय स्पर्धा घेतल्या जातात, या स्पर्धेत तालुका, जिल्हा, विभागीय पातळीवर यश मिळवत सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 17 वर्षे वयोगटात 300 मीटर रेसवॉक स्पर्धेसाठी राज्यातील विभागातून आलेल्या 17 स्पर्धकांतून पहिला क्रमांक मिळवला आहे. पंजाब येथील तंजनूरात पार पडणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच प्रतिनिधीत्व करणार आहे. पुण्यात 10 दिवसांच्या निवासी शिबीरात नामांकीत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जाणार आहे.  


उदगीर पासुन जवळच असलेल्या नावंदी या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुबांत तनिषाचा जन्म झाला. मुलांच्या शिक्षणासाठी तनिषाचे आई वडील उदगीरात राहतात. लालबहादुर शास्त्री शाळेत दहावीचे शिक्षण घेत तनिषाने खेळाची आवड जोपासली. कबड्डी, खो -खो, धावणे या स्पर्धेत भाग घेण्याची तिची आवड पाहुन नायक क्रिडा मंडळाने तिला मैदान उपलब्ध करुन दिले.

सांघिक खेळाबरोबर वैयक्तीक खेळात यश मिळवण्यासाठी रेसवॉक खेळाची निवड करुण प्रशिक्षक विजय राठोड यांच्या मार्गदशनाखाली ती तीन वर्षांपासुन सराव करत होती.  खेळात यश -अपयशाची पर्वा न करता सकाळी संध्याकाळी उपलब्ध साधनांचा वापर करत नियमीत सराव करून ती यश मिळवत गेली. यंदा दहावीचे महत्वाचे वर्ष असुन नियमीत खेळाचा सराव करत ती अभ्यासही करते. राष्ट्रीय स्पर्धेत यश तर मिळवायचेच आहे. मात्र ऑलंपिक स्पर्धेत जिंकण्याचे ध्येय ठेवुन ती मेहनत घेत आहे. नायक क्रिडा मंडळाचे अध्यक्ष संजय राठोड ,सचिव सतिश उस्तुरे ,प्रशिक्षक विजय राठोड यांनी सत्कार करुन आभिनंदन केले.
 

ऑलंपिक स्पर्धा जिंकायचीय !
ऑलंपिक स्पर्धेत चीन सारखा देश सर्वच मैदानी खेळात सहभागी होवुन सर्वाधीक पदक मिळवतो. त्यासाठी तेथील खेळाडुंचा लहानपणापासुन सराव करुन घेतला जातो. मलाही ऑलंपिक स्पर्धा जिंकायची आहे.

- तनिषा केंद्रे, खेळाडु, रेसवॉक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT