lature sakal
मराठवाडा

Lature News : नातवंडांनी दिले आजी आजोबांना ‘गिफ्ट’

तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव भंडारे, शेतकरी शिवाजीराव अंचोळे, प्रा. भगवानराव पेठकर, डॉ. विजयकुमार राठी आदी उपस्थित होते

सकाळ वृत्तसेवा

औराद शहाजानी - संयुक्त कुटुंब संस्कृती लुप्त होत असताना विद्यार्थ्यांना आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळावे तसेच संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा म्हणून औराद शहाजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नातवंडांनी आपल्या आजी-आजोबांचे पाय धुवून औक्षण केले. तसेच गप्पागोष्टी करीत आजी आजोबा दिनाचा आनंद घेतला.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव भंडारे, शेतकरी शिवाजीराव अंचोळे, प्रा. भगवानराव पेठकर, डॉ. विजयकुमार राठी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात ‘दादा दादी कम टू द स्कुल’ हे स्वागत गीत श्रद्धा मगनुरे, रणवीर बिरादार, आयुषी जाधव, पूजा भंडारे, पार्थ पौल यांनी सादर केले.

त्यानंतर भक्ती वागदूरे, प्रणाली पाटील, सफा शेख, दिशा थेटे, प्रीती जमादार, आराध्या काणेकर, वैभवी सगरे, रेणुका सौदागर, यश पहेलवान, आयान मुला, समर्थ शेळके, समर्थ कोडे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रीतम पवार, समर्थ गायकवाड, कृष्णा चौधरी, कृष्णा सूर्यवंशी, आदित्य हाडोळे, रुद्र पाटील आदींनी तुझमे रब दिखता है व एलकेजी व युकेजीच्या अर्चना पिचारे, वेदिका मुळे, अनुष्का आमले, प्रियांश उगले, तेजस उगले, समर्थ फुलारी, श्रीनिधी जोशी, अपूर्वा काळे, श्री डिघे, प्रथमेश बिरादार, प्रगती कांबळे, गोदा काबरा, आलीना बडूरे, प्रिन्स सूर्यवंशी, अमृता सूर्यवंशी, श्रीधर पाटील यांनी दादाजी की छडी हू मैं या गाण्यावर नृत्य सादर केले.

नंतर आजी आजोबा यांचे त्याच्या नातवंडांकडून पाय धुवून, ओवाळणी करून व स्वतः बनवलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या. त्यानंतर तन्वी पाटे, सृष्टी मुगळे, अनुष्का लातूरे, तन्न्या पांचाळ, आरोही पाटील, रितेश लाड, आदित्य दापके, मधुरा आकडे आदींनी आजी आजोबांचे महत्त्व याबद्दल आपले विचार व्यक्त केले.सूत्रसंचालन सरिता पाटील, अमर मुल्ला, अंजली स्वामी, रिहान मुल्ला यांनी तर आभार प्रदर्शन श्रुती कुलकर्णी यांनी केले हे कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Flights: IndiGo संकटात? 200 फ्लाइट्स रद्द, शेअर्स कोसळले… पण सुप्रीम कोर्टात आज नक्की काय घडणार?

farming Success Story:'निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी घेतले डाळिंबाचे उत्पादन'; किलोला दोनशे रुपये दर; माण तालुक्यात क्षेत्र वाढले..

Beed Railway: बीड, आहिल्यानगर रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना दिलासा

Voter List Error Nashik Incident : मतदार यादीतील गोंधळाचा उत्तम नमुना आला समोर! ; नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांना चक्क मृत दाखवले !

शंभुराजने प्राजक्ताला उचलून घेतलं आणि... लग्नानंतरचा जेजुरीतला नवदाम्पत्याचा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT