फोटो 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्याची स्थागुशा ‘चिखलीकर’ यांच्या हाती 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदाची जबाबदारी आता देगलुरचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यांच्यासोबतच जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांचेही खांदेबदल केले आहेत. मंगळवारी (ता. २४) रात्रीच श्री. चिखलीकर यांनी स्थागुशाचा पदभार स्विकारला आहे. यांच्यासमोर जिल्ह्यातील अवैध धंदे व शहरातील लुटमार, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी व खंडणीचे प्रकार थांबविण्याचे आव्हान आहे. ते हे प्रकार थांबवतील अशी अपेक्षा नांदेडकरांकडून व्यक्त होत आहे. 

जिल्हा पोलिस दलाचा आत्मा म्हणून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाहिल्या जाते. या शाखेच्या प्रमुखाला दंडाधिकाऱ्यांच्या अधिकार असतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी या शाखेला सतर्क रहावे लागते. जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळत सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. तसेच जिल्हातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहून अवैध धंदेचालकांना सळोकी पळो करुन सोडावे लागणार आहे.  

गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख

शाखेचा पदभार हा अनुभवी व गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना द्यावा लागतो. त्या पध्दतीने पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी देगलुरचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची वर्णी लावली. मागील काही दिवसापासून येथील स्थानिक गुन्हे शाखेची राज्यात चर्चा सुरू होती. पंरतु श्री. चिखलीकर यांच्या आगमनमुळे आता त्यावर पुर्णविराम पडला आहे. या शाखेला पुर्णवेळ अधिकारी मिळाल्याने शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचा काम करण्यासाठी उत्साह वाढणार आहे. 

श्री डोईफोडे बिलोली तर श्री धबडगे यांना देगलूर

श्री. मगर यांनी सध्या स्थागुशाची जबाबदारी सांभाळणारे शिवाजी डोईफोडे यांना बिलोली पोलिस ठाणे दिले आहे. तर त्या ठिकाणचे भगवान धबडगे यांच्यावर देगलुर पोलिस ठाण्याची जबाबदारी टाकली आहे. देगलुर शहर हे तसे संवेदनशिल असल्याने श्री. धबडगे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या ठाण्याचा दोन वेळेस श्री. चिखलीकर यांनी पदभार सांभाळला आहे. तसेच लिंबगाव पोलिस ठाण्यात र. गु. बोरसे यांना पाठविले आहे. तर लोहा येथील पोलिस निरीक्षक बालाजी मोहीते यांची लोहा येथून चलबांगडी करून नियंत्रण कक्षात बोलावले आहे. त्यांच्या ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी  बंडे यांना पाठविले आहे. येणाऱ्या काळात अजून काही पोलिस निरीक्षकांचे खांदेपालट होणार असल्याचे बोलल्या जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT