Nanded-DCC-bank.jpg 
मराठवाडा

'या'मुळे शेतकरी दुहेरी अडचणीत

कृष्णा जोमेगावकर

नांदेड :  कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू असताना आवश्यक सेवा म्हणून सर्व बँकांचे व्यवहार चालू आहेत. परंतु नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखातील व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

इतर बॅंकांतील व्यवहार सुरु
सगळ्या बँकातील व्यवहार सुरू असताना फक्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराला जिल्हा प्रशासनाने का स्थगिती दिली असा सवाल करून ही स्थगिती तत्काळ उठून शेतकऱ्यांसाठी बँक सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

शेतकऱ्यांना अडचण
कोरोना हा आजार जागतिक समस्या असल्याने प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन शेतकऱ्यांसह सर्वच समाजघटक करत आहेत. परंतु अत्यावश्यक म्हणून बँकेतील व्यवहार सुरळीत ठेवण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. सगळ्या बँका व त्यातील व्यवहार कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत परंतु शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहार मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

जमा पैसेही काढता येइनात
ता. ३० मार्चपर्यंत बँकेतील आर्थिक व्यवहार करण्यास स्थगिती दिली होती, परंतु अद्यापही बँकेच्या शाखेतील व्यवहार बंदच आहेत. अनुदानाचे पैसे, पीक विम्याचे पैसे, शेतकऱ्यांचे काही जमा असलेले पैसे तसेच  उसाचे पैसे बँकेत असूनही शेतकऱ्यांना ते उचलता येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. 

शेतातील कामे सुरु 
लाॅकडाऊन काळात सध्या शेतात हळद काढण्यासह अन्य कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे म्हणून प्रशासन फक्त शेतकऱ्यांनाच आर्थिक स्थगिती का देत आहे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. जिल्हा बँकेने सुधारित सूचना काढावी व कोरणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी, काळजी घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरू करावेत अशी मागणी प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. 

गोदाश्रद्धा सेवा समूह
गोदाश्रद्धा सेवा समूहाकडून सिडको भागात गोरगरिब कुटुंबांना धान्य वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत तीस किट वाटप करण्यात आल्या आहेत. दानशूर व्यक्तींना सहकार्य करून या रोपट्याला वटवृक्षामध्ये रूपांतर होण्यास हातभार लावावा, असे आवाहन सेवा समूहाचे मार्गदर्शक गजानन जोशी यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर बोंबीलवार, प्रशांत पेंडकर, गिरीष मोरे, सोनू ठाकूर, संजय कंधारे, शुभम बोंबीलवार, बालाजी सिरसाट हे परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT