जिल्हा विधी सेवा रॅली
जिल्हा विधी सेवा रॅली 
मराठवाडा

कायदेविषयक रॅलीने शहर दणाणले

प्रल्हाद कांबळे

 नांदेड : कायद्याची व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा न्यायालय ते आयटीआय चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे हिरवी झेंडी दाखवून संत बाबा बलविंदरसिंग, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधिश आर. एस. रोटे यांनी उद्घाटन केले.

यावेळी जिल्हा सरकारी वकिल आशिष गोधमगावकर, वकिल संघाचे अध्यक्ष मिलींद लाटकर, उपाध्यक्ष जगजीवन भेदे, प्रा. डाॅ. उषा सरोदे, न्यायालय व्यवस्थापक महेंद्र आवटे यांच्यासह सर्व न्यायाधिश, वकिल मंडळी उपस्थित होती. ही रॅली शनिवारी (ता. १६) नोव्हेंबर सकाळी साडेसात वाजता जिल्हा न्यायालयातून मार्गस्थ झाली. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम


महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा व महाराष्ट्र विधी सेवा यांचेमार्फत राबवण्यात येणा-या विविध योजना व दिल्या जाणा-या मोफत विधी सहाय याबाबत माहिती देण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विविध सामाजीक उपक्रम राबवित असते. त्यातलाच एक भाग म्हणून शनिवारी ही रॅली काढून नांदेडकरांसाठी कायद्याचे ज्ञान व बालकांचे हक्क याबाबत जनजागृती केली. साडेसात वाजता निघणार आहे. 

विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणिय 


या रॅलीमध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या सामाजीक संककुलाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महिला, मुली व बालकांच्या हक्कासंदर्भात विद्यार्थ्यानी घोषणा दिल्या. यासोबतच शहरातील काही शाळांनीही आपल्या विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदविला होता. जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधिश, वकिल मंडळी, कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सुज्ञ नागरिक यांनी सहभाग घेत रॅली यशस्वी केली. ही रॅली सकाळी नऊ वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर येऊन समाप्त करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया, श्री. काकडे यांनी मार्गदर्शन केले.

न्यायालयाने मानले सर्वाचे आभार

रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हातात कायद्याबद्दल माहिती व आपले हक्क व कर्तव्याचे फलक देण्यात आले होते. सकाळ सहा वाजल्यापासूनच जिल्हा न्यायालयाचा परिसर विद्यार्थ्यानी गजबजून गेला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचीव तथा न्यायाधिश आर. एस. रोटे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT