leopard leopard
मराठवाडा

आष्टीत आढळला मृत बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

आष्टी तालुक्यातील डोंगराळ भागात आजही अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसून येतात

निसार शेख

आष्टी (बीड): आष्टी-पाटोदाच्या सरहद्दीवर असलेल्या आष्टी (ashti) तालुक्यातील मातावळी परिसरातील डोंगर दरीत मृत व कुजलेल्या अवस्थेत बिबट्या (dead leopard in beed) सापडल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) घडली आहे. नेमका बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी शोध घेत आहेत. घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. आष्टी तालुक्यात मागील वर्षी बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. आष्टी तालुक्यात बिबट्याने तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर दोन व्यक्तीवर हल्ला चढवला होता. या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते.

शुक्रवारी (ता.१८) सकाळी आष्टी तालुक्यातील मातावळीच्या डोंगरामध्ये जनावरे चारण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना मृत व कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचे मुंडके, जबडा, हाडे आणि कातडी आढळून आली. या घटनेची माहिती आष्टीच्या वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन सदरील मृत बिबट्याची पाहणी करून हा बिबट्या महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा दावा वनविभागाचे अधिकारी शाम शिरसाठ यांनी केला आहे.

आष्टी तालुक्यातील डोंगराळ भागात आजही अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसून येतात. आष्टी-पाटोदा  सीमेवर असलेल्या मातावळी डोंगर परिसरात दोन बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून असल्याचे येथील शेतकऱ्यांतून बोलले जात असून त्यांनी कोणावरही हल्ला केला नाही. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले असून बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समोर येईल असे वनविभाग अधिकारी शाम शिरसाठ यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात आजचा ताजा भाव किती? जाणून घ्या

IND vs AFG: भारतीय संघ निवडताना BCCI केलीय मोठी चूक; आयर्लंड, इंग्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानही अय्यरच्या संघाला लोळवणार

Mumbai News: VIPसाठी सामान्य नागरिकाला ढकललं, पोलिसांनी सायकल दिली फेकून; Video Viral

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : नोकरीची सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 67 लिपिक पदांची भरती; TCS मार्फत होणार परीक्षा, 'हे' प्रमाणपत्र असणे बंधनकारक

Marathi News Live Updates : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड; CBI चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT