File Photo 
मराठवाडा

‘एलआयसी’चा ‘हा’ प्लॅन तुम्हाला देईल जन्मभर पेन्शन

शिवचरण वावळे

नांदेड : निवृतीनंतर शासकीय नोकरीत असणाऱ्यांना व्यक्तींनाच पेन्शन मिळते, असा अनेकांचा गैरसमज आहे. तुमच्या मनात जरी हा विचार असेल तर, तो काढून टाका आणि जाणून घ्या भारतीय जीवन विमा कंपनीने तुमच्यासाठी कोणती योजना सुरु केली आहे. वास्तविक पाहता ही योजना तशी जुनी असली, तरी या योजनेला जास्त प्रसिद्धी मिळालेली नाही. हल्ली ‘एलआयसी’च्या या योजनेला ग्राहकांची सर्वांधिक पसंती मिळत आहे.

तुम्हाला देखील वयाच्या पन्नासीनंतर पेन्शन हवी असेल तर किंवा वयाच्या कुठल्या स्टेजला पेन्शन हवी आहे. हे तुम्हाच ठरवा आणि ‘भारतीय जीवन विमा कंपनी’च्या ‘जीवन शांती’ योजनाचा लाभ घ्या. ही योजना सर्वांसाठीच योग्य अशी आहे. परंतु या पेन्शन योजनेसोबतच काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. या योजनेत पॉलिसीधारक ग्राहकांना वार्षिक योजनेच्या माध्यमातून तत्काळ अथवा स्थगित वार्षिक योजना अशा दोन्ही प्लॅनची निवड करता येऊ शकते. पॉलीसी आॅनलाइन किंवा आॅफलाइन देखील खरेदी करत येते.

पॉलिसी नको असल्यास १५ दिवसांत परत करु शकता
जीवन पेन्शन योजनेत केवळ संबंधीत पॉलिसीधारकास नव्हे तर, परिवाराला देखील लाभ देणारी एक मात्र प्लॅन मानला जतो. इतकेच नाही तर, एखाद्या ग्राहकाने पॉलिसी विकत घेतल्यानंतर त्यास पॉलिसीबद्दल काही अडचण असेल किंवा पॉलिसी नको असल्यास १५ दिवसांत ग्राहक ती पॉलिसी भारतीय जीवन विमा कंपनीकडे परत करु शकतो. ही पॉलिसी विकत घेणाऱ्या ग्राहकास किमान एक ते दीड लाख रुपयास खरेदी करावी लागत असली तरी, त्यासाठी कुठलीही मर्यादा नाही.

पॉलिसी खरेदी करायची असेल तर
असे असले तरी, हा प्लॅन वर्ष दोन वर्षापासून सुरु झाला असला तरी, या बद्दल एलआयसीच्या एजंटकडून फारशी माहिती दिली जात नाही. त्यास कारणही तसेच आहे. कारण या पॉलिसीमध्ये ग्राहकास एकदाच रक्कम फिक्स करायची असते. त्यानंतर त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना पेन्शन लागू होते. त्यामुळे ही पॉलिसी खरेदी करायची असेल तर, संबंधीत ग्राहकास स्वतः जीवन शांती पॉलिसीबद्दल चौकशी करावी लागते. एखाद्या व्यक्तीने जर एक लाख रुपयापर्यंत एकदाच रक्कम भरली तर त्या व्यक्तीस निश्चित केलेल्या वर्षात किमान साडेसहा हजार रुपये पेन्शन म्हणून दिली जाते.

तुम्हाला कसा हवाय प्लॅन
भारतीय जीवन विमा कंपनीने ए, बी, सी, डी आणि ई असे प्रकारात या पॉलिसीची वार्षिक विभागणी केली आहे. त्यामुळे पहिला विकल्प ‘ए’ मध्ये तत्काळ वार्षिक, विकल्प ‘बी’ मध्ये ग्राहकास पाच वर्षाची गॅरंटी देण्यात आली असून, त्यासोबत जीवन तत्काळ वार्षिक, विकल्प ‘सी’ मध्ये दहा वर्षाची गॅरंटी, विकल्प ‘डी’ मध्ये १५ वर्षाची गॅरंटी आणि शेवटच्या विकल्प ‘इ’मध्ये वीस वर्षापर्यंत गॅरंटी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या पुढे देखील अनेक विकल्प देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकास जीवन शांतीचा लाभ घेता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT